Electric Scooter News: जबरदस्त वैशिष्ट्यांसह ‘लेब्रेटा इलेट्रा’ देणार 127 किमीची रेंज! वाचा बाजारपेठेत केव्हा होणार लाँच?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Scooter News:-सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढताना दिसू देत असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहने नक्कीच परवडतील अशी एक सध्या स्थिती आहे. त्यामुळे अनेक स्कूटर तसेच  बाईक्स आणि कार इत्यादी अनेक वाहने इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये सध्या बाजारपेठेत येताना दिसून येत आहेत व यामध्ये अनेक नामांकित कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळले आहेत.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. परंतु अजून पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन वगैरे इत्यादी पायाभूत सुविधा खूप कमी असल्यामुळे आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या किमती देखील जास्त असल्यामुळे हव्या त्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक वाहन रस्त्यांवर दिसत नाहीत. परंतु हळूहळू यामध्ये या दृष्टिकोनातून काम सुरू असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावताना दिसतील हे मात्र निश्चित.

त्यामुळे बऱ्याच कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहने निर्मितीचे काम केले जात आहे व यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. या मुद्द्याला धरून जर आपण सर्वात मोठी ऑटो कंपनी असलेल्या लॅम्ब्रेटाचा विचार केला तर ही कंपनीने ELCMA2-023 मध्ये नवीन इलेट्रा हे इलेक्ट्रिक स्कूटर कन्सेप्ट सादर केली असून या ब्रँडचे इलेक्ट्रिक मॉडेल आहे. याच इलेक्ट्रिक स्कूटरची खास वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत.

 वाचा या इलेक्ट्रिक स्कूटरची खास वैशिष्ट्ये

लॅम्ब्रेटा एलेट्रा इ स्कूटर कॉन्सेप्ट ही स्टीलच्या फ्रेमवर बिल्ड करण्यात आलेली असून या स्कूटरमध्ये डीआरएलसोबत हेक्सागोनल एलईडी हेडलॅम्प देण्यात आलेले आहेत. तसेच या स्कूटरचे फ्लॅट फ्लोअर बोर्ड भरपूर अशा लेगरुमचे वचन देतो. तसेच फ्लोटिंग सिंगल सीट देखील खूप रेट्रो असे दिसते. यामुळे कन्सल्टची स्टाईल वाढवण्यास मदत होते. तसेच या स्कूटरमध्ये चार्जिंग सॉकेट हे पॅनेलच्या बाजूला स्लाइडर सोबत देण्यात आलेले आहे.

तसेच महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हँडल बार वरील पॉप आउट ब्रेक लिव्हर हे होय. एलिट्रा इलेक्ट्रिक कन्सेप्ट ही 12 इंच वाहनावर ट्रेन लिंक फ्रंट सस्पेन्शन आणि लिंक मोनोशॉकसह ऑफर केली जाते.. जर आपण या स्कूटरचा कमाल वेग पाहिला तर 110 किलोमीटर आहे व कंपनीच्या दाव्यानुसार इलेक्ट्रिक स्कूटर 4.6 kWh बॅटरी पॅकच्या माध्यमातून एका इलेक्ट्रिक मोडमध्ये 127 किलोमीटर धावू शकते.

 भारतात होईल का लॉन्च?

कंपनीकडून ही इलेक्ट्रिक स्कूटर लवकरात लवकर बाजारपेठेत सादर करण्यासाठी काम सुरू असून इटालियन दुचाकी भारतीय बाजारपेठेमध्ये तिच्या नवीन इलेक्ट्रिक अवतारात पाहणे खूपच आकर्षक ठरेल. परंतु भारतात हे लॉन्च होईल की नाही हे सांगता येणे सध्या कठीण आहे.