Hyundai Venue 2024 : लॉन्च झाले Venue चे नवीन व्हेरियंट ! पहिल्यापेक्षा काय झाला बदल? जाणून घ्या किंमत आणि नवीन वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Venue 2024 : ह्युंदाई मोटर्सकडून आगामी काळात नवीन कार लॉन्च करण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये ह्युंदाईकडून त्यांच्या कार सादर केल्या जाणार आहेत.

ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये लोकप्रिय Venue कारचे नवीन व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे. या कारमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच ही कार पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित असणार आहे.

Hyundai Venue नवीन व्हेरियंट

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची नवीन Venue कार लॉन्च करण्यात आली आहे. ग्राहकांना Venue कारच्या नवीन व्हेरियंटमध्ये चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. पहिल्यापेक्षा कारच्या फीचर्समध्ये देखील वाढ झाली आहे. Venue चे एक्झिक्युटिव्ह व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे.

Venue च्या नवीन व्हेरियंट वैशिष्ट्ये

Venue कारच्या नवीन एक्झिक्युटिव्ह व्हेरियंटमध्ये ड्युअल टोन स्टाइल 16 इंच अलॉय व्हील देण्यात आली आहेत. तसेच कारमध्ये गडद क्रोम फ्रंट रेडिएटर ग्रिल, रूफ रेल, शार्क फिन अँटेना आणि बाहेरील बाजूस एक्झिक्युटिव्ह बॅजिंग देखील देण्यात आले आहे.

कारमध्ये फ्रंट सेंटर आर्मरेस्ट, 2-स्टेप रिअर रिक्लाइनिंग सीट, 60:40 स्प्लिट सीट, ॲडजस्टेबल हेडरेस्ट, आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले, डिजिटल क्लस्टर, TFT MID, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

किती सुरक्षित आहे

Venue कारचे नवीन व्हेरियंट पहिल्या कारपेक्षा अधिक सुरक्षित असणार आहे. Venue कारच्या नवीन व्हेरियंटमध्ये सहा एअरबॅग्ज, सर्व सीटसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, ESC, VSM, HAC, IRVM, स्वयंचलित हेडलॅम्प आणि हायलाइनमध्ये TPMS सारखी सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत.

Hyundai Venue इंजिन आणि किंमत

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या नवीन व्हेरियंट एक्झिक्युटिव्हमध्ये एक लिटर टर्बो GDI इंजिन दिले आहे. हे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. हे इंजिन 120 PS पॉवर आणि 172 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या नवीन एक्झिक्युटिव्ह व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9,99,990 रुपये ठेवण्यात आली आहे.