Mahindra Thar 5 Door : थार लव्हरसाठी मोठी बातमी ! ‘या’ दिवशी लाँच होणार महिंद्रा थार 5 डोअर ; जाणून घ्या सर्वकाही ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Thar 5 Door : आज भारतीय बाजारात महिंद्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून महिंद्रा भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या काळात कंपनीच्या कार्स देखील ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे. मात्र आता सर्वांना महिंद्राची लोकप्रिय कार महिंद्रा थारच्या 5 डोअर व्हर्जनची प्रतीक्षा आहे. तुम्ही देखील महिंद्रा थार 5 डोअरची प्रतीक्षा करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो मारुती सुझुकीची ऑफ-रोड एसयूव्ही मारुती जिमनी 5 डोअरला टक्कर देण्यासाठी महिंद्रा येणाऱ्या काही दिवसात बाजारात मोठा धमाका करत महिंद्रा थार 5 डोअर लाँच करू शकते. सध्या बाजारात महिंद्रा थार 3 डोअर धुमाकूळ घालत आहे. यातच कंपनीने आपला स्वस्त व्हेरियंट थार रिअर व्हील ड्राइव्ह लॉन्च केला आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 6 लाखांपासून सुरु होते. तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार महिंद्रा थार 5 डोअरची टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात महिंद्रा थार 5 डोअर रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

महिंद्रा थार 5 डोअरची इंजिन

आगामी महिंद्रा थार 5 डोअरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, ते 2.0 लिटर mStallion टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर mHawk टर्बो डिझेल इंजिनमध्ये पाहिले जाऊ शकते, जे 152 bhp पॉवर तसेच 320 न्यूटन मीटर पिकअप टॉर्क जनरेट करते. 5 डोअर थारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिसेल. 4X4 ड्राइव्ह थार 5 डोअरमध्ये देखील दिसेल. थार 5 डोअर सध्याच्या 3 डोअरपेक्षा 2-3 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

नवीन महिंद्रा थार 5 डोअर अनेक नवीन फीचर्सनी सुसज्ज असेल

Mahindra Thar 5 Door ला रुंद टायर तसेच हलके स्टीयरिंग व्हील आणि उत्तम सस्पेंशन सेटअप मिळेल. थारच्या 5- डोअर व्हेरिएंटमध्ये 6 रंग पर्याय दिसू शकतात. उर्वरित फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक एसी, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील आणि रूफ माउंटेड स्पीकर्स आणि मल्टीपल एअरबॅग्ज, हिल स्टार्ट कंट्रोल, ईएससी यांसारखी स्टन्डर फीचर्स मिळतील.

हे पण वाचा :-   IMD Alert : सावध राहा ! 21 फेब्रुवारीपर्यंत 9 राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर तर ‘या’ राज्यात होणार बर्फवृष्टी ; वाचा सविस्तर