Maruti Suzuki EV Car: मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर धावेल 550 किमी! वाचा कधी येईल मार्केटमध्ये?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki EV Car:- सध्या वाढत्या प्रदूषणाच्या आणि डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा कल हा आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर तसेच दुचाकी व कार देखील आता विविध कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येत आहेत.

आता कार उत्पादक कंपन्यांमध्ये जर आपण पाहिले तर भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी असून या कंपनीने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार भारतीय बाजारपेठेत दाखल केलेले आहेत. त्याहीपुढे जात आता मारुती सुझुकी ही कंपनी आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये पदार्पण करत असून पुढील वर्षी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ही इलेक्ट्रिक एसयूव्ही तयार केली जाण्याची शक्यता आहे.

 मारुती सुझुकी तयार करणार इलेक्ट्रिक एसयूव्ही

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी येणाऱ्या कालावधीत इलेक्ट्रिक एसयूव्ही गुजरात मध्ये तयार करणार असून अहमदाबाद पासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या हंसलपुर येथील सध्या अस्तित्वात असलेल्या प्लांटमध्ये एक नवीन प्लांट जोडला जाणार आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये त्याचे काम सुरू झाले व सध्या या ठिकाणी तीन प्लांट आहेत. या ठिकाणी जाता इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी प्रोडक्शन लाईनच्या नावाने एक नवीन प्लांट जोडला जाणार आहे.

 कधी लॉन्च होईल मारुती सुझुकीची ईव्ही?

मारुती सुझुकी चे कार्यकारी संचालक राहुल भारती यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की कंपनीचे पहिले इलेक्ट्रिक वाहन एसयूव्ही असणार असून ते पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या गुजरात प्लांटमध्ये हे इलेक्ट्रिक एसयूव्ही तयार केली जाणार आहे.

या प्लांटमध्ये तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कारची निर्यात देखील केली जाणार आहे. याकरिता गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये गुजरात सरकार सोबत सामंजस्य करार  देखील करण्यात आलेला होता व या अंतर्गत कंपनीच्या माध्यमातून हंसलपूर येथील प्लांटमध्ये 3100 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील करण्यात येणार आहे.

 सिंगल चार्जवर धावेल 550 किलोमीटर

मारुती सुझुकी कंपनीची पहिली वहिली एसयुव्ही एका चार्जवर 550 किलोमीटर अंतर पार करू शकेल. या कारमध्ये 60 किलो वॅट बॅटरी देण्यात आलेली आहे.

सध्या मारुती सुझुकीच्या गुजरात प्लांटमध्ये वार्षिक साडेसात लाख युनिट्स उत्पादन क्षमता असून या ठिकाणी तयार होणारी वाहने  देशातच विकली जात नाही तर त्यांची निर्यात देखील केली जाते. मारुती सुझुकी या प्लांट मधून बलेना तसेच स्विफ्ट, डिझायर सारख्या मॉडेलची निर्मिती देखील करते.