मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी इलेक्ट्रिक कार बाजारात उतरणार ! टाटाचे टेन्शन वाढणार, काय आहे अंबानींचा प्लॅन ?

Tejas B Shelar
Published:
Reliance Electric Car

Reliance Electric Car : भारताचा कार बाजार हा खूपच मोठा बनला आहे. भारतीय कार बाजारात पेट्रोल डिझेलच्या वाहनांसोबतच इलेक्ट्रिक वाहन देखील मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. अनेक नामांकित कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. पण, सध्यास्थितीला भारतीय बाजारात टाटा मोटर्स इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतय.

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये शीर्ष स्थानावर विराजमान आहे. भारताच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण मार्केट कॅप मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला पाहायला मिळतोय. टाटा मोटर्सला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी देखील इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये जोरदार धमाका करण्याच्या तयारीत आहे.

अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रिलायन्स कंपनी देखील इलेक्ट्रिक कार बाजारात इंट्री घेणार आहे. याबाबत कंपनीकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा दावा केला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार टेस्ला ही कंपनी भारतीय बाजारात येण्यास उत्सुक आहे. विशेष म्हणजे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मस्क भारतात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.

स्वतः त्यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. एकीकडे एलॉन मस्क हे भारत दौऱ्यावर येत आहेत तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्स मध्ये टेस्ला भारतात प्रकल्प उभारण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची मदत घेणार असल्याचा दावा होत आहे.

बिजनेसलाईनने याबाबत वृत्त दिले आहे. यात असं म्हटले गेले आहे की, गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असताना मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तसेच गेल्या महिनाभरापासून रिलायन्स आणि टेस्लातील अधिकारी यांच्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, आठवड्याभरापूर्वी भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांविषयीचे आपले सुधारित धोरण जाहीर केले आहे. अशातच आता मस्क भारत भेटीवर येत आहे. या सर्व घटनाक्रमानवर बारीक नजर टाकल्यास असे दिसून येते की टेस्ला भारतात लवकरच इलेक्ट्रिक कार निर्मिती सुरू करू शकते.

यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची मदत घेतली जाऊ शकते. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये हा दावा होत आहे. पण जर हे खरे असेल तर या दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी कशा एकत्र येतात, त्यांचा संयुक्त उपक्रम कसा राहणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

रिलायन्सने अथवा टेस्लाने याविषयीचा खुलासा केलेला नाही. पण सूत्रानुसार, टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती, त्यासंबंधीची सुविधा पुरविण्याचे काम रिलायन्स करु शकते. तसेच टेस्ला ही दोन ते तीन दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करू शकते असा दावा होत आहे. यासाठी कंपनीचे अधिकारी सध्या भारतात आले असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे कंपनीची आणखी एक टीम या चालू महिन्यात भारतात येऊ शकते आणि ही टीम महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात मध्ये प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा शोध घेऊ शकते असे म्हटले जात आहे. यामुळे आता टेस्ला भारतात कुठे प्रकल्प उभारणार आणि रिलायन्ससोबत ही कंपनी कशी भागीदारी करणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe