Tractor Information: महिंद्राचे 68 एचपी क्षमतेचे ‘हे’ ट्रॅक्टर शेतकऱ्यांना ठरेल फायद्याचे! वाचा या ट्रॅक्टरची किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Information:- कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रिकीकरण होऊ लागल्यामुळे शेतीच्या अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी आता मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर होतो. यंत्रांच्या वापरामुळे आता शेतकऱ्यांच्या कष्टामध्ये बचत तर झाली.परंतु कमी वेळेत जास्तीत जास्त कामे देखील होऊ लागलीत.

या कृषी यंत्रामध्ये जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर  शेतीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर केला जातो. याकरिता भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपन्या असून यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी ट्रॅक्टर निर्मितीच्या बाबतीत अग्रेसर असून महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

आजपर्यंत महिंद्रा कंपनीने अनेक वैशिष्ट्य असलेल्या मॉडेलचे ट्रॅक्टर दिले असून यातील महिंद्रा कंपनीच्या नोव्हो सिरीजचे ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले आहेत. जर आपण महिंद्रा कंपनीच्या या सिरीज मधील ट्रॅक्टरचा विचार केला तर ते शक्तिशाली इंजिन सह येतात.

त्यामुळे शेतीचे सर्व कामे अतिशय सोप्या पद्धतीने करणे शक्य होते. जर तुम्हाला देखील शेतीच्या कामांकरिता ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही महिंद्रा कंपनीच्या नोव्हो सिरीज मधील महिंद्रा नोव्हो 655DI PP V1 हे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 277 NM चे जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करणारे शक्तिशाली इंजिन पाहायला मिळते. त्याच्या साहाय्याने तुम्ही शेती आणि इतर व्यवसाय कमी पूर्ण करू शकतात.

 महिंद्रा NOVO 655 DI PP V1 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला चार सिलेंडर असलेले वॉटर कुल्ड इंजन दिलेले असून जे 68 एचपी पावर जनरेट करते. या ट्रॅक्टरचा कमाल टॉर्क 277 NM आहे. तसेच या ट्रॅक्टरचे इंजिन 2100 RPM जनरेट करते आणि ते ड्राय टाइप एअर फिल्टरसह येते. त्यामुळे इंजिनला धूळ आणि घाणीपासून बचाव होण्यास मदत होते.

कंपनीच्या या ट्रॅक्टरचा कमाल पीटीओ पावर 58.4 एचपी आहे. जर आपण या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता पाहिली तर ती 2700 किलो इतकी आहे. त्यामुळे एकावेळी अधिक वजन वाहून नेण्यासाठी हे ट्रॅक्टर सक्षम आहे. या ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टेरिंग देण्यात आले असून 15 फॉरवर्ड आणि पंधरा रिव्हर्स गिअर्स यामध्ये देण्यात आलेले आहेत.

या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल स्लीप्टो  प्रकारचा क्लच देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरचा कमाल फॉरवर्ड स्पीड ताशी 33.5 किलोमीटर आणि रिव्हर्स स्पीड 32 किलोमीटर प्रतितास इतका ठेवला आहे. यामध्ये उत्तम दर्जाचे ब्रेक देण्यात आलेले आहेत व हे ट्रॅक्टर 4WD म्हणजे चार चाकी ट्रॅक्टर आहे.

एवढेच नाही तर या ट्रॅक्टरला 16.9×28 रियर टायर देण्यात आलेले असून त्या आकाराने खूप मोठे आहेत. ट्रॅक्टरच्या माध्यमातून तुम्ही एमबी नागर, कल्टीवेटर, रोटरी टेलर, गायरोव्हेटर, पोस्ट होल डीगर, प्रेशर तसेच प्लांटर व लेव्हलर इत्यादी यंत्रे आरामात चालवू शकतात.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

या ट्रॅक्टरची किंमत पाहिली तर भारतामध्ये 13.15 लाख ते 13.65 लाख( एक्स शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्स इत्यादीमुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. यासोबतच या ट्रॅक्टरची सहा वर्षाची वारंटी देण्यात आली आहे.