Gold Rate Today : गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावर सोने, चांदी करा खरेदी, वाचतील एवढे पैसे; पहा नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today : उद्या गणपतीबाप्पाचे (Ganapatibappa) आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने तुम्ही सोने किंवा चांदी (gold or silver) खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

गेल्या व्यापार सप्ताहात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण (decline) नोंदवण्यात आली. यामध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 47,300 रुपयांपर्यंत आहे.

आज सोन्या-चांदीचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात असलेल्या सोन्याच्या तेजीला आज ब्रेक लागला आहे. सोनं आज प्रतितोळे 51,430 रुपयांना विकलं जात आहे. आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 51 हजार 405 रुपये आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याजा दर 51466 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

सोनं आजही उच्चांकी किमतीपेक्षा स्वस्त

मात्र या घसरणीनंतरही सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4795 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. दरम्यान शुल्क, राज्य कर आणि घडवळीवरील शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या (jewelry) किंमती (Price) भारतभर बदलतात. तसेच हे दरपत्रक सूचक आहे. स्थानिक पातळीवर या दरात बदल होण्याची शक्यता असते.

भारतातील महत्त्वाचे शहर आणि पेट्रोल- डिझेचे दर

शहरं 22 कॅरेट 24 कॅरेट

चेन्नई – ₹47,650 – ₹52,000
मुंबई – ₹47,150 – ₹51,430
दिल्ली – ₹47,300 – ₹51,600
कोलकत्ता- ₹47,150 – ₹51,430
बंगलोर – ₹47,200 – ₹51,490
हैदराहबाद – ₹47,150 – ₹51,430
केरला – ₹47,150 – ₹51,430
पुणे – ₹47,180 – ₹51,460
वडोदरा – ₹47,180 – ₹51,460
अहमदाबाद – ₹47,200 – ₹51,490
जयपूर – ₹47,300 – ₹51,600
लखनऊ – ₹47,300 – ₹51,600

कशी तपासाल सोन्याची शुद्धता?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर-

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.