Soybean Bajarbhav : बळीराजा संकटात ! सोयाबीन दरात आजही घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची लागवड महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश म्हणजेच सर्वत्र केली जाते.

निश्चितच या पिकाची लागवडीखालील क्षेत्र अधिक असल्याने राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून असते. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचे कायमच सोयाबीन बाजारभावाकडे लक्ष लागून असते.

अशा परिस्थितीत आपण आपल्या वाचक मित्रांसाठी याच्या लिलावाची माहिती दररोज घेऊन येत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची आणि सोयाबीन दराची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5 हजार क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 5575 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 5325 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 41 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर पाच हजार 600 आणि सरासरी बाजारभाव 5400 एवढा राहिला आहे.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये 10 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला किमान दर 4502, कमाल दर 5,300 आणि सरासरी बाजार भाव 5000 रुपये नमूद झाला.

संगमनेर एपीएमसी :- या ठिकाणी आज 34 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला किमान दर 4401, कमाल दर पाच हजार 475 आणि सरासरी बाजार भाव 4938 नमूद झाला.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारपेठेत आज सोयाबीनची 74 क्विंटल आवक झाली असून सोयाबीनला किमान दर 5000, कमाल दर 5551 आणि सरासरी दर 5450 मिळाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 7791 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5150 एवढा किमान दर, कमाल दर 5423, 5286 इतका सरासरी दर मिळाला.

परभणी एपीएमसी :- आज परभणी एपीएमसी मध्ये ११३७ क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5300 एवढा किमान दर, कमाल दर 5650 आणि सरासरी दर साडेपाच हजार रुपये नमूद झाला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1344 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४४०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 5494 आणि सरासरी बाजार भाव 5221 नमूद झाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5735 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5,367 रुपये नमूद झाला आहे.

कोपरगाव एपीएमसी :- या एपीएमसी मध्ये आजचा 726 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लवारीया एपीएमसी मध्ये सोयाबीनचा चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5575 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5351 रुपये नमूद झाला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- जालना एपीएमसीमध्ये आज 7224 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 5,387 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5630 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 नमूद झाला आहे.