Soybean Market Price: सोयाबीन विकण्याचं नियोजन आखताय ना…! मग आज 13 ऑगस्टचे सोयाबीन बाजारभाव जाणून घ्या, अन विक्रीचे नियोजन आखा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price: सोयाबीन (Soybean Crop) हे एक प्रमुख तेलबिया पीक असून आपल्या देशात याची मोठ्या प्रमाणात लागवड (Soybean Farming) केली जाते. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean production) महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा असून एकूण उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

अर्थातच महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) सर्व अर्थकारण हे सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे (Soybean Farmer) सोयाबीन बाजार भावाकडे (Soybean rate) मोठे बारीक लक्ष लागून असते.

आम्हीदेखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी दररोज सोयाबीनचे ताजे लेटेस्ट बाजार भाव (Soybean prices) आणत असतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आज 13 ऑगस्ट 2022 रोजी सोयाबीनचे ताजे बाजारभाव.

मालेगाव (वाशीम) कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज मालेगाव एपीएमसीमध्ये सोयाबीनची 27 क्विंटल आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला कमीत कमी पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा होता. आज या एपीएमसीमध्ये सर्वसाधारण तर सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर मिळाला. तसेच जास्तीत जास्त दर सहा हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा होता आणि सर्वसाधारण दर पाच हजार 915 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 3459 क्विंटल एवढी आवक नमूद करण्यात आली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर 5850 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला तर जास्तीत जास्त दर सहा हजार 175 रुपये एवढा होता. आज या एपीएमसीमध्ये 6012 रुपये एवढा सर्वसाधारण दर सोयाबीनला मिळाला.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत 201 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला कमीत कमी 5 हजार 505 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला तर जास्तीत जास्त दर सहा हजार एवढा राहिला. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 752 रुपये एवढा सर्वसाधारण दर मिळाला.

वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज्या एपीएमसीमध्ये पांढऱ्या सोयाबीनची 25 क्विंटल आवक झाली. आज सोयाबीनला कमीत कमी सहा हजार शंभर रुपये एवढा दर मिळाला तर जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. आज या एपीएमसीमध्ये सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण दर सोयाबीनला मिळाला.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती:– लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सहा हजार 193 क्विंटल एवढी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये कमीत कमी सहा हजार 280 रुपये एवढा सोयाबीनला बाजार भाव मिळाला तर जास्तीत जास्त सहा हजार 467 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आज या एपीएमसीमध्ये सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन ला मिळाला.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती:- चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 330 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 515 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून 6145 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव सोयाबीनला मिळाला. आज या एपीएमसीमध्ये 5830 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती:– आज बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 66 क्विंटल एवढे सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये 6041 रुपये एवढा कमीत कमी सोयाबीनला बाजार भाव मिळाला तर जास्तीत जास्त सहा हजार 135 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव सोयाबीनला मिळाला. आज या एपीएमसीमध्ये सहा हजार 98 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज पैठण एपीएमसीमध्ये सोयाबीनची तीन क्‍विंटल आवक झाली. आज सोयाबीनला 5830 एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला तर जास्तीत जास्त बाजार भाव 5830 एवढाच होता आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील 5830 एवढाच राहिला.

भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा होता. आज या एपीएमसीमध्ये सहा हजार 250 रुपये एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज भोकर एपीएमसीमध्ये दोन क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये 6000 प्रति क्विंटल एवढा बाजार भाव राहिला.

परतूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज या एपीएमसीमध्ये तीन क्विंटल सोयाबीनची आवक झाली. 5800 रुपये एवढा सोयाबीनला कमीत कमी दर मिळाला. तर 6076 रुपये एवढा सोयाबीनला जास्तीत जास्त बाजार भाव होता. आज 5 हजार 972 रुपये एवढा सोयाबीनला सर्वसाधारण दर मिळाला.

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती:- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 20 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर सोयाबीनला मिळाला असून सहा हजार पाचशे रुपये एवढा जास्तीत जास्त दर सोयाबीनला मिळाला. आज या एपीएमसीमध्ये सहा हजार तीनशे रुपये एवढा सर्वसाधारण दर सोयाबीनला मिळाला.

देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- एपीएमसीमध्ये आज मात्र एक क्विंटल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला 6201 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला.

सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती:- सेनगाव एपीएमसीमध्ये आज 40 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव मिळाला तर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीन ला जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला आज या एपीएमसीमध्ये 6 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव राहिला.

उमरखेड (डांकी) कृषी उत्पन्न बाजार समिती:- या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 190 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक आज नमूद करण्यात आली. आज सोयाबीनला पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर या एपीएमसीमध्ये मिळाला. तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये एवढा होता. सर्वसाधारण दर 5 हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला.