Soybean Market Price : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीन दरात तब्बल एक हजाराची वाढ, वाचा आजचे बाजारभाव

Ajay Patil
Published:
Soyabean Price

 

Soybean Market Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Soybean Grower Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत आहे.

गेल्या महिन्याभरात पूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणार सोयाबीन (Soybean Crop) काल पर्यंत साडेपाच हजार रुपयांच्या आसपास होता. गत आठवड्यात तर सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला होता.

अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) मनात सोयाबीनच्या दराबाबत मोठी संभ्रमावस्था होती. आज झालेल्या लिलावात सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे.

मित्रांनो सोयाबीनच्या दरात (Soybean Bajarbhav) आज चांगलीच वाढ झाली असून घनसावंगी एपीएमसीमध्ये (Apmc) आज सोयाबीनला सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती : उदगीर एपीएमसीमध्ये आज 750 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात उदगीर एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात उदगीर एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 60 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात तुळजापूर एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात तुळजापूर एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती :- मोर्शी एपीएमसीमध्ये आज 50 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात मोर्शी एपीएमसीमध्ये 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात मोर्शी एपीएमसीमध्ये 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसीमध्ये आज 132 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात नागपूर एपीएमसीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 275 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज नागपुरी एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 56 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 90 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये पाच हजार 75 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती :- ताडकळस एपीएमसीमध्ये 67 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला. तसेच सोयाबीनला ताडकळस एपीएमसीमध्ये 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 652 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात अकोला एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये एवढा किमान बाजार भाव मिळाला. तसेच पाच हजार 365 रुपये प्रति क्विंटल एवढा हमाल बाजार भाव मिळाला. तसेच पाच हजार 195 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज अकोला एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :-  वाशिम एपीएमसीमध्ये आज 21 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात वासिम एपीएमसीमध्ये 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5351 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात वासिम एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो आज घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समिती मधून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोदी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज घनसावंगी एपीएमसीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे. आज घनसावंगी एपीएमसीमध्ये सोयाबीनची 50 क्‍विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात घनसावंगी एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात घनसावंगी एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.