Soybean Market Price : चिंताजनक! सोयाबीन बाजारभाव आज पण पाच हजारावरच, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : मित्रांनो सोयाबीन (Soybean Crop) या पिकाची खरीप हंगामात लागवड केली जाते. आपल्या राज्यात सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.

देशात एकूण सोयाबीन उत्पादनाचा विचार करता मध्य प्रदेश हे राज्य शीर्षस्थानी विराजमान असून महाराष्ट्राचा (Maharashtra) दुसरा क्रमांक लागतो. निश्चितच आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र अधिक असून राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Soybean Grower Farmer) कायमच सोयाबीनच्या बाजार भावाकडे (Soybean Rate) नजरा लागून असतो. यामुळे आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीनच्या बाजारभावाविषयी (Soybean Bajarbhav) रोजच माहिती घेऊन हजर होत असतो.

आज देखील आपण सोयाबीन बाजारभावाविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला मिळालेला बाजार भाव.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 216 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात माजलगाव एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5076 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज माजलगाव एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये आज दोन हजार 100 सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात कारंजा एपीएमसीमध्ये चार हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून पाच हजार 160 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4975 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये 80 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4751 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5026 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 45 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज झालेल्या लिलावात तुळजापूर एपीएमसीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, कमाल आणि सर्वसाधारण बाजारभाव नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुरी एपीएमसीमध्ये आज 293 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात नागपूर एपीएमसीमध्ये 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 75 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात नागपुरी एपीएमसीमध्ये 4869 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 345 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये 4799 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 992 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4949 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 617 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल एवढा अभिमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 225 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसीमध्ये आज 132 क्विंटल सोयाबीनचे अभंग झाली आज झालेल्या लिलावात चिखली एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 951 रुपये प्रति क्विंटल कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच 4826 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज बाराशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रतिक्विंटल किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 170 रुपये प्रतिक्विंटल कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज एपीएमसीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 600 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 225 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 125 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.