श्रीगोद्यात स्वस्तात सोने देतो म्हणत २ लाखाचा ऐवज लुटला !

श्रीगोंदा :- तालुक्यातील काही परिसर रात्रीच्यावेळी प्रवासास धोक्याचे तर आहेच परंतु दिवसाही गाडी लुटण्याचे प्रकार या निर्जन रस्त्यावर घडतात.

येथून मागे स्वस्तात सोने देतो म्हणत लुटण्याचे प्रकार घडलेले असताना काल पुन्हा स्वस्तात सोने घेण्यासाठी मुंबईहन आलेल्या तरुणास ५ जणांनी श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या शिवारात विसापूर ते उख्खलगाव कच्च्या रस्त्यावर बोलावले.

६ च्या सुमारास कृष्णा व त्याच्याबरोबरील ५ आरोपींनी स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून लाकडी काठीने बेदम मारहाण करुन त्याच्याजवळील १लाख ७६ हजाराची रोकड व मोबाईल हॅण्डसेट असा २ लाखाचा ऐवज लुटला. चोरटे फरार झाले.

याप्रकरणी संजय कुमार दुखी, वय २६ रा. अंधेरी वेस्ट, धंदा कुक, मुंबई या तरुणाच्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलिसात कृष्णा नावाच्या आरोपीसह इतर ५ आरोपीवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment