शिर्डीतील पर्यटन विकासाला चालना देणार – उत्कर्षा रूपवते

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासाला जशी चालना देणार, तसे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास यावर आपला भर असेल. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वास शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला. अकोले तालुक्यातील आंबड येथे रुपवेते बोलत होत्या. अकोले तालुक्यातील गावात जाऊन मतदारांच्या भेटी … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय २७) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका भागातील अल्पवयीन मुलगी १२ … Read more

संविधान वाचविण्यासाठी ११ हजारांची मदत ! बौध्दाचार्य संजय कांबळे यांनी आ. लंकेेंकडे केला धनादेश सुपूर्द आरपीआय आंबेडकर गटाचा लंकेंना पाठींबा

देशाचे संविधान वाचले पाहिजे अशी भूमिका घेत बैध्दाचार्य संजय कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना ११ हजार रूपयांचा निवडणूक निधी दिला. दरम्यान आर पी आय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशान्वये या पक्षाचा निलेश लंके यांना पाठींबा जाहिर करण्यात आला आहे. शेखर पंचमुख यांनी सांगितले की, बहुजनांना अभिमान … Read more

अ‍ॅड कोल्हे यांची आ. लंके यांनी घेतली भेट पोलिसांनी गुुंडगिरीला चाप लावण्याची मागणी

न्यायालयाच्या आवारात करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अ‍ॅड. अशोक कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. नीलेश लंके यांनी नगर येथील रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. लंके यांनी अ‍ॅड. कोल्हे यांना धीर देत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अ‍ॅड. कोल्हे यांच्याकडून घटनेचा तपशील जाणून घेतल्यानंतर वकीलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी … Read more

संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न

संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न असून, कॉंग्रेस पक्षाकडून जाणीवपुर्वक खोडसाळपणाची वक्‍तव्‍य केली जात असल्‍याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सक्‍टे यांनी केला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ प्रा.मच्छिंद्र सक्‍टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे … Read more

ॲड अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे यांनी व्यक्त केला निषेध

न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या … Read more

श्रीरामपूरात गोल्टी कांद्याला अकराशेंचा भाव

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळ्या गोल्टी कांद्याला अकराशे ते दीड हजाराचा बाजारभाव मिळाल्याची माहिती सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. काल बुधवारी (दि.८) एकुण ८ हजार २८० कांदा गोण्याची आवक झाली होती. सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर एक नंबर प्रतिचा कांदा १५०० ते दोन … Read more

पश्चिमेकडील घाटमाथ्याचे पाणी पूर्वेकडे वळविणार : मुख्यमंत्री शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : संगमनेर नगर व नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असून दोन विभागामध्ये पाणी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे वळविणे गरजे आहे. महायुतीचे सरकार हे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित संगमनेर येथील सभेत … Read more

सेंद्रिय उसाच्या रसवंतीला पसंती

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाच्या तडाख्यात सद्या नेवासा शहर परिसरात लाकडी चरख्याच्या व सेंद्रिय रसवंती गृहाकडे लोकांची अधिक पसंती दिसू लागली आहे. आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने लोक भरउन्हात ताज्या रसाचा आस्वाद घेतांना दिसत आहे. नेवासा शहराच्या दक्षिणेस खुपटी रस्त्यावर संतोष गायकवाड या शेतकऱ्याने ग्राहकांची गरज ओळखुन सेंद्रिय उसाची रसवंती सुरू केली आहे. या रसवंतीकडे नेवासा शहरातील लोक … Read more

मानवतेची सेवा करणाऱ्या लंके यांना संसदेत पाठवा शरद पवार यांचे आवाहन श्रीगोंदे येथे पवार यांची जाहिर सभा संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

कोरोना संकटात संपूर्ण जग भितीच्या छायेखाली असताना आपल्या जीवाची पर्वा न करता तीस हजारांहून अधिक कोरोना रूग्णांच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या नीलेश लंके यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत … Read more

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या संगमनेर व श्रीरामपूरमध्ये सभा ! मोटारसायकल रॅलीने स्वागत

Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यंत्री एकनाथ शिंदे हे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा संगमनेर व श्रीरामपूर या ठिकाणी सभा घेणार आहेत. दुपारी दोन वाजताची संगमनेरची सभा उरकून ते सायंकाळी पाच वाजता श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. एका मतदारसंघात एकाच वेळी दोन ठिकाणी सभा घेणार असल्याने महायुतीचे कार्यकर्ते सभेच्या … Read more

गोदावरी पट्टयात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर ! गावांमधील शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठच्या गावांमधील शेतकरी हैराण झाले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न उभा राहिला आहे. प्रचंड होत असलेला वाळू उपसा, नदीपात्रात ठिकठिकाणी टाकलेले बेसुमार विजेचे आकडे, … Read more

निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी पुन्हा नगरमध्ये; शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफही धडाडणार, सकाळी श्रीगोंद्यात तर सायंकाळी नगरमध्ये प्रचार सभा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी (दि.८) पुन्हा नगरमध्ये येत असून त्यांच्या सोबत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफही या वेळी धडाडणार आहे. माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात हे ही यावेळी उपस्थित राहणार असून या तिन्ही नेत्यांची सकाळी १०.३० वाजता … Read more

तुमच्याकडे यंत्रणा, मग रडीचा डाव का खेळता ? अभिषेक कळमकर यांचा सवाल नगरमधील मारहाणीच्या आरोपास प्रत्युत्तर

तुमच्याकडे भरभक्कम यंत्रणा असेल तर असे रडीचे डाव खेळण्याची आवश्यकता नसली पाहिजे. नीलेश लंके यांनी यापूर्वी बऱ्याचदा सांगितले आहे की, निवडणूक निवडणूकीच्या पध्दतीने खेळा.तुमच्या हातून निवडणूक सटतेय हे तुम्ही नगर दक्षिणच्या जनतेला दाखवून देत असल्याचे सांगत नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी डॉ. सुजय विखे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी : वाकडी येथील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी येथे चार पिल्लांसह वास्तव्य असलेल्या बिबट्याने पानसरे यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची घटना दि. २ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. वाकडीतील पानसरे वस्तीवरील शेतकरी सचिन सुभाष पानसरे सकाळीच जनावरांचा चारा आणण्यासाठी सकाळीच शेतात गेले होते. येथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांची व बिबट्याची चांगलीच झटापट … Read more

पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी २० जणांवर गुन्हा : १० आरोपी अटकेत

Ahmednagar News

Ahmednagar News : शुक्रवारी श्रीरामपूर शहरात मिरवणुकीमध्ये बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेल्या दगडफेक प्रकरणी २० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. शुक्रवारी रात्री संदल मिरवणुकीत हा प्रकार घडला होता. पोलीस इतर आरोपींच्या मागावर आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की शुक्रवारी रात्री साडे नऊ … Read more

भंडारदऱ्याच्या पाण्यातून नेवाशातील बंधारे भरावे

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा नदीवरील बंधाऱ्यासाठी चालू आवर्तनातून पाणी आरक्षित असतानाही हेडचे बंधारे भरले; मात्र नेवाशातले तीन शासकीय बंधारे अद्याप भरून दिले नसल्याने पाचेगाव, पुनतगाव, चिंचबन, खुपटी, नेवासा बु. व नेवासा आदी गावांतील लाभधारकांमध्ये निर्माण झालेला असंतोष विचारात घेऊन नेवासा तालुक्यातले तीनही टेलचे बंधारे भरून द्यावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केली … Read more

घराला आग, वस्तूसह दुचाकी जळून खाक ! अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ

Ahmednagar News

Ahmednagar News : खडकी येथे राहणाऱ्या गणेश उत्तम शिरसाठ यांच्या राहात्या घराला काल गुरूवार (दि.२) दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी, टीव्ही व इतर दैनंदिन वापरातील साहित्य आगीत जळून खाक झाले. दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला होता. आगीचे लोट एवढे मोठे होते की, … Read more