Ahmednagar News | राहुल गांधींकडून आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान , पाचपुतेंची खरमरीत टीका

सर्व घटनात्मक, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार घटनेने राहुल गांधींना दिला असताना न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करून काँग्रेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अवमान करीत असल्याची घणाघाती टीका भाजपा आ.बबनराव पाचपुते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. आ.पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, न्यायालयाच्या … Read more

Ahmednagar News | मालवाही पिकअप विजेच्या पोलवर धडकली

पाथर्डी तालुक्‍यातील कासार पिंपळगाव परिसरातील रस्त्यावरील इरिगेशन कॉलनी येथील विजेच्या खांबाला (दि.२४) रोजी मालवाहतूक पिकअपने धडक दिल्याने सात पोलबरील गाळूयांच्या विद्युत वाहक तारांचे नुकसान झाले आहे. सदर पिकअप आदिनाथनगर, वृद्धेश्‍वर कारखाना येथून वाघोलीकडे जात होती. पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने गाडी वीजवाहक पोलवर धडकल्याने महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. वाहन चालकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही; … Read more

Ahmednagar News | संगमनेरातील बँकेची 82 लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युवरसह २३ जणांवर गुन्हा दाखल

शहरातील जी. एस. महानगर को. ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये गोल्ड व्हॅल्यूअरच्या माध्यमातून ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. यापुढे आणखी किती बँकांचे घोटाळे समोर येतील हे लवकर उघड होईल. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गोल्ड व्हॅल्युबरसह २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई … Read more

Ahmednagar News | चार गावठी कट्टे, आठ काडतुसांसह दोघे जेरबंद

तालुक्‍यातील बेलापुर बुद्रूक येथील बाजारतळ येथे विक्री करण्याचे उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे अवैधरित्या बाळगणारे दोन आरोपीना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १ लाख ४५ हजार ७०० रुपये किंमतीचे मुद्देमेलासह जेरबंद केले आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, दत्तात्रय डहाळे (रा. … Read more

Ahmednagar News |न्यायालयासमोर हजर न राहणारे पाचजण जेरबंद

वारंवार समन्सची तसेच अजामीनपात्र वाँरंटची बजावणी करून देखील न्यायालवासमोर हजर न राहणाऱ्या पाच जणांना भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. अक्षय संजय भिंगारदिवे, रामा अंकुश इंगळे (दोघे रा. निंबोडी ता.नगर), पवन राजेंद्र नायकू (रा.नेहरू चौक, भिंगार), स्वप्निल सुधाकर शेलार (रा.शिवाजी चौक, भ्रिंगार), महेश सुरेश गायकवाड (रा. सरपन गल्ली, भिंगार) … Read more

Ahmednagar News | सुपा एमआयडीसीतील कंपनी कामगाराची आत्महत्या

पारनेर तालुक्‍यातील सुपा एमआयडीसीतील पीजी टेक्नो प्लास्ट कंपनीतील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. अमित राजेंद्रप्रसाद यादव (वय ३४), मूळ रा. उत्तर प्रदेश हल्ली, रा. पीजी टेक्नो प्लास्ट कंपनी कामगार वसाहत, सुपा एमआयडीसी, असे आत्महत्या केलेल्या कामगारचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की,दि.२४ रोजी कंपनी वसाहतीमधील खोलीतील इतर कामगार जेबणासाठी निघाले, त्यावेळी अमित … Read more

Ahmednagar News | पुणे – नगर महामार्गावर धावत्या बसला लागली आग, चालकाच्या प्रसंगवधानांमुळे वाचले प्राण

पारनेर तालुक्यातील पुणे, नगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात खासगी ट्रॅव्हल बसला आग लागल्याने बस जळून खाक झाली. या वेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी बचावले. ही घटना शनिवार, दि.२५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, शनिवार, दि.२५ मार्च रोजी जळगाव ते पुणे ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने होती. बस नारायणगव्हाण … Read more

Ahmednagar News | उधारीचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

सोन्याच्या उधारीचे राहिलेले दोन लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून ते बुडविण्याच्या उद्देशाने सोने व्यापाऱ्याला त्रास दिला व काहीतरी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. वाघोली (पुणे) येथील नितीन सुधाकरराव उदावंत, असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. संशयित आरोपी ओम छगनराज टाक, प्रशांत छगनराज टाक दोघे रा. पाथर्डी, निलेश सुधाकर तीन माळवे.रा. गेवराई यांच्याविरुद्ध पोलिसांत … Read more

पिंपळगाव व वडगावची जमीन MIDC साठी नाही, आमदार तनपुरेंची माहिती

Ahmednagar News: नगर तालुक्यामधील पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता गावातील शेतकऱयांचा २०११ पासून प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागला आहे. मौजे बडगाव गुप्ता ब पिंपळगाव माळवी येथील अधिसूचनेच्या अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्र औद्योगिक क्षेत्राच्या (नगर एमआयडीसी) विकासासाठी आवश्यक नाहीत. असे राज्य शासनाचे मत झालं आहे. पोट कलम (३) कलम २. खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्‍तीचा वापर करून … Read more

तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी; कर्जत तालुक्यातील घटना

Ahmednagar News : काळ्या रंगाच्या चार चाको वाहनातून आलेल्या अज्ञातांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्‍यातील बाभूळगाव दुमाला येथे घडली. या हल्ल्यात हनुमंत साहेबराव माळवदकर व विठ्ठल हनुमंत माळवदकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांनाही भिगवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार … Read more

संगमनेरात कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा, पावणे दोन लाखाचे गोमांस पकडले

Ahmednagar News : शहरातील मदिनानगरमधील एका वाड्यावर शहर पोलिसांनी नुकताच छापा टाकला. यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचे आढळून आले. या छाप्यात पोलिसांनी सुमारे पावणेदोन लाख रुपये किंमतीचे ७०० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीबरुन फरिद जावेद कुरेशी (रा.जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याविरुद्ध येथील शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

मुलासह सून केसांना धरून मारहाण करते, सासूची पोलिसात धाव

राहते घर आपल्या नावे करण्याची धमकी देत मुलगा व सुनेने एका वृद्ध महिलेला मारहाण केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सतीश रामदास कदम (वय ५८) आणि अलका सतीश कदम (वय ५५, दोघेही रा. टाकळीभान) यांचा समावेश आहे. याप्रकरणी तालुक्‍यातील बेलापूर येथील कौशल्याबाई रामदास कदम यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

Ahmednagar Used car : अहमदनगर मध्ये Toyota Fortuner सोळा लाखात तर Maruti Ertiga साडे सहा लाख ! पहा आजच्या टॉप ५ डील्स

नमस्कार नगरकर ! आपण सर्वच जण आयुष्यात एक कार घेण्याचे स्वप्न बाळगत असतो पण वाढत्या महागाई आणि भारत सरकारच्या ऑटो धोरणाबद्दलच्या चेंजेसमुळे दिवसेंदिवस कारच्या किंमतीत वाढच होताना दिसते अश्या परिस्थितीत आपल्याकडे जुनी कार घेण्याचा पर्याय शिल्लक असतो. मार्केटमध्ये अनेक जुन्या कार उपलब्ध असतात यातून आपण आपल्या परिवारासाठी एक कार घेऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. … Read more

कोतवाली पोलिसांचा रोडरोमिओना दणका ; 18 जणांवर कारवाई

Ahmednagar News : कोतवाली पोलिसांनी रोडरोमिओंना चांगलाच दणका दिला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहर परिसरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या १८ रोडरोमिओंवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. बाडीयापार्क येथे फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, तसेच कोचिंग कक्‍्लासेससाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंकडून त्रास दिला जात होता. काही रोडरोमिओ हे जोरात मोटारसायकल चालविणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, रस्त्यावर … Read more

पेटीएमकडून आल्याचे सांगत दोन व्यापाऱ्यांना लुटले

Ahmednagar News : राहुरी पेटीएममध्ये कामाला असल्याचे खोटे सांगून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका व गोटुंबे आखाडा येथील एका अशा दोन व्यापाऱ्यांना दोन भागट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. एकाच्या खात्यावरून २९ हजार व दुसऱ्याच्या खात्यावरून १० हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, कौ प्रकाश शिवाजी नगरे (वय ३५ वर्षे) हे … Read more

जमिनीच्या वादातून भावनेचं केला भावावर कोयत्याने वार

Ahmednagar News : शेती ब घराच्या वाटणीवरून लहान भावाने मोठ्या भावावर कोयत्याने वार केल्याची घटना राहुरी तालुक्‍यातील गणेगाव येथे दिनांक १७ मार्च रोजी घडली. या घटनेत जखमी झालेल्या मोठ्या भावावर श्रीरामपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रशांत गुलाब कोबरणे (वय ३० वर्षे, राहणार गणेगाव, ता. राहुरी) हे आई ब लहान भाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संगमनेर, श्रीरामपूर, राहात्याला गारपिटीचा तडाखा !

श्रीरामपूर शहर व तालुक्यात काल दुपारी वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाने हजेरी लावली. श्रीरामपूरबरोबर राहाता तालुक्यातील राजूर, ममदापूर, खंडाळा येथेही गारपीट झाली. संगमनेरच्या पठार भागालाही गारपीटीने झोडपले.कोपरगावात सायंकाळी अवकाळी पाऊस वरसला. गारपीटीसह आलेल्या अवकाळी पावसाने श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील रव्याच्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा,  बेलापूर, खोकरसह अनेक शिवारात शेतात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाच्या रेशन भ्रष्टाचारासह रेशन कार्ड गैरव्यवहार प्रकरण…

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील कोट्यवधी रुपयाच्या रेशन भ्रष्टाचारासह रेशन कार्ड गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडील दीर्घ प्रलंबित चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकारी यांच्या पत्रव्यवहार नंतरही दिले जात नसल्याच्या निषेधार्थ व पुरवठा कार्यालयातून हजारो रेशन कार्ड गहाळ होऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून दोशींना बचाव केला जात असून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक … Read more