कारखान्यावर जायला उशिर झाला अन ‘तो’ जिवालाच मुकला….?

dead_body_of_youth_found_on_national_highway_in_lakhimpur_kheri_1584257493-1

Ahmednagar News:सध्या एकीकडे दिवाळीची लगबग सुरू आहे तर दुसरीकडे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांची आवराआवर चालू आहे. दरम्यान कारखान्यावर जाण्यास उशीर झाला म्हणून मुकादमाने केलेल्या मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला आहे. संजय माळी (रा. खडांबे ता. राहुरी) असे त्या दुर्दैवी ऊसतोड मजुराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, राहुरी तालुक्यातील खडांबे … Read more

पुणे, अहमदनगर, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील नागरिक इकडे लक्ष द्या पुढील ३ ते ४ तासांत घराबाहेर….

राज्यात मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. तर दुसरीकडं अहमदनगर, नाशिक, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात शेतीचं तर नुकसान झालंच आहे पण नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा … Read more

अहमदनगरकडे येणाऱ्या खासगी बसला रांजणगावजवळ अपघात

Ahmednagar News:अहमदनगर महामार्गावर रांजणगावजवळ आज पहाटे खासगी बसला अपघात झाला. यामध्ये दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यातील १० जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीवर गावी गावी निघालेल्या प्रवाशांचा यामध्ये समावेश आहे. पहाटेच्या सुमारास पुण्यातून नगरच्या दिशेने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याचे एसपी बदलले ! सध्याचे मनोज पाटील यांच्याबद्दल झाला ‘हा’ निर्णय

Ahmednagar SP

Ahmednagar SP : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी (District Superintendent of Police Ahmednagar) राकेश ओला (Rakesh Ola) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच सध्याचे जिल्हा पोलीस … Read more

ह्यामुळेच विखे पाटील राज्यात मोठ्या मंत्रीपदावर पोहचले ! आता…

 Ahmednagar Politics  : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याचा प्रवास आता यशस्‍वी दिशेने सुरु झाला आहे. चांगले वाईट दिवस आणि प्रदिर्घ संघर्ष करुन, सहकार चळवळ टिकवून ठेवण्‍यासाठी इतर कारखान्‍यांनाही सहकार्य केले, परंतू आता डॉ.विखे पाटील कारखाना स्‍वतंत्र झाला असल्‍याने प्रवरा कुटूंबातील सभासदांच्‍या उत्‍कर्षासाठीच यापुढे वाटचाल असेल असा विश्‍वास व्‍यक्‍त करतानाच भावाच्या स्पर्धेत आपला कारखाना … Read more

Karjmafi Yojana : आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अहमदनगरच्या शेतकऱ्याने दाखल केली होती याचिका

karjmafi yojana

Karjmafi Yojana : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना (Yojana) राबवण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या (Farmer Scheme) … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी ! तुम्ही पदवीधर असाल तर हे वाचाच…

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीचा सखोल पुनःरिक्षण कार्यक्रम १ ऑक्टोबर २०२२ पासून सुरु झालेला आहे. … Read more

सुजाता सागर फडके यांचा हा महिला महोत्सव राज्यासमोर एक आदर्श – आमदार मोनिकाताई राजळे

शेवगाव,ता.१२: शेवगाव सारख्या ग्रामिण भागात महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता असे उपक्रम आवश्यक आहेत. स्वत:चा प्रभाग आदर्श करुन शहराचे नेतृत्व करण्याचे देखील नगरसेवक सागर फडके यांच्यात क्षमता असल्याचे या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून स्पष्ट होते. असे प्रतिपादन अभिनेत्री हिंदवी पाटील यांनी केले. शेवगाव येथे जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुप यांच्या संयुक्त विदयमाने कोजागिरी पौर्णिमेनिमत्त महिला महोत्सवाचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी !

Ahmednagar News :- अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. हे पण वाचा : सोने खरेदीची हीच ती संधी ! दरात 3 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात १० ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा नदीत ओझर बंधारा ४५७ क्यूसेस, गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १६१४ क्यूसेस व जायकवाडी धरणातून १८८६४ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ५२२८ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून ३००० क्युसेस, सिना नदीत सिना धरणातून ७१७ क्यूसेस आणि मुळा नदीस … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ महिला सरपंच आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित….!

Ahmednagar News:नगर तालुक्यातील निंबळक गावच्या सरपंच प्रियंका अजय लामखडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बेळगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी सरपंच त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या … Read more

‘ती’ चौघे भावंडे आंघोळीसाठी गेली अन् काळाने घात केला

लहान तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार भावंडांचा वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील वांदरकडा येथे घडली. अनिकेत अरूण बर्डे (वय ८), ओंकार अरुण बर्डे (वय ७), दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. शनिवारी दुपारी ही चौघे … Read more

अंगावर डिझेल ओतले अन कडी ओढली…. मात्र खाकी आडवी आली…?

Ahmednagar News :खासगी सावकारांवर कारवाई करून त्याने हडप केलेली जमीन परत मिळावी म्हणून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र , पोलिसांनी प्रसंगावधान राखत हा आत्मदहनाचा प्रयत्न वेळीच रोखला. सुनील शंकर नगरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनील शंकर नगरे हे जिल्हाधिकारी … Read more

Ahmednagar Politics : सौ शहरी, एक संगमनेरी, थोरतांचा विखे पाटलांना इशारा

Ahmednagar Politics : राज्यात सत्तांतर होऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूलमंत्री पद मिळाले. तेव्हापासून त्यांनी आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या काळातील कामांच्या चौकशीचे इशारे तर कधी संगमनेरमध्ये जाऊन कार्यक्रम घेतले जात होते. अखेर थोरात यांनी विखे यांचे नाव न घेता त्यांना … Read more

नगरला आणखी एका पोलिसाची आत्महत्या, कुटुंबियांचे गंभीर आरोप

Ahmednagar News:श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सुनील धोंडीबा मोरे (वय ५४) यांनी घरातील लोखंडी जिन्याला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मोरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यात मुळा धरणावरील पोलिस चौकीत भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९) यांनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी … Read more

खासदार डॉ. विखे पाटील मोहटादेवी चरणी नतमस्तक

Ahmednagar News:राज्यभर नवरात्री उत्सव साजरा होत असताना सातव्या माळेला खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले. यावेळी विखे पाटील परिवाराच्यावतीने देवी मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी 24 तास फराळ वाटप सुरू असलेल्या केंद्रावर भेट देऊन भाविकांना स्वतःच्या हाताने त्यांनी फराळाचे वाटप केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भाणगे, अभय आव्हाड मा.नगराध्यक्ष, नंदुशेठ शेळके मा.नगरअध्यक्ष, … Read more

रोहित पवारांच्या ‘जय श्रीराम’ची चर्चा

Ahmednagar News:राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याला आफल्या मतदारसंघात होणाऱ्या रावण दहनानिमित्ताने ‘जय श्रीराम’ असे ट्विट केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शनिवारी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेटही चर्चेत आहे. आमदार … Read more

नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असून आत्तापर्यंत त्यांनी नगरच्या शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. जलसंपदा खात्यावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढणार असून नगरकरांना हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय विश्रामगृह … Read more