अहमदनगर ब्रेकिंग : प्राजक्त तनपुरेंसह सात उमेदवारांचे अर्ज दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि.२४) माजीमंत्री आणि विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह ७ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. दि.१८ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र वितरण आणि नामनिर्देशन स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवार दि.२३ एप्रिल अखेर अहमदनगर लोकसभा मतदार संघाकरिता नऊ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दाखल केले होते.

बुधवारी आणखी सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजीमंत्री विद्यमान आमदार प्राजक्ता तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या प्रतिनिधीने दाखल केला.

तर अन्य उमेदवारांत रवींद्र लीलाचंद कोठारी, मदन कानिफनाथ सोनवणे, अमोल विलास पाचुंदकर, महेंद्र दादासाहेब शिंदे, मच्छिद्र राधाकिसन गावडे, छगन भिकाजी पानसरे यांचा समावेश आहे. बुधवार अखेर अहमदनगर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १६ झाली आहे.

गुरुवारी (दि. २५) नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत आहे. तर शुक्रवार दि.२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया होणार आहे.