Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळं का झालं? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यावर आज स्पष्टच बोलले..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : खा.शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत विखे त्यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रतिउत्तर खा.शरद पवार यांना दिले आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्व देत नसून त्यांनी आता त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता केली पाहिजे असा घणाघात विखे यांनी केला. तसेच जिल्ह्यात नेत्यानेत्यांत भांडणे लावून देण्याचे काम त्यांनी केल्याने जिल्ह्याची प्रगती झाली नसल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केला.

नेमके काय म्हणाले पालकमंत्री विखे?
पालकमंत्री म्हणाले, शरद पवारांच्या वक्तव्यांना मी जास्त महत्व देत नाही व आता त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता केली पाहिजे असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे. खोटं बोला, पण रेटून बोला हा त्यांचा धंदा असल्याचा घाणघातही त्यांनी केला.

राधाकृष्ण विखे पाटलांवर पक्ष बदलावरुन शरद पवारांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना ते म्हणाले, शरद पवारांमध्ये तरी सातत्य कुठे दिसते? ते कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात तर कधी भाजपाला पाठिंबा देऊन तो काढायलाही लावतात. ज्या काँग्रेसशी विदेशी मुद्द्यावर फारकत घेतली त्यांच्या पायाशी जाऊन बसायचं असा टोला त्यांनी लगावला.

जिल्ह्यात नेत्यानेत्यांत भांडणे लावून…
शरद पवार यांना स्वकीय सोडून गेले असल्याने त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अहमदनगरमध्ये नेते नेत्यानेत्यांत नेहमी भांडणे लावून देण्याचे काम पवार यांनी केले त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नसल्याचे विखे पाटील म्हणाले. स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात आणि अवघे 10 उमेदवार तुम्हाला देता येतात असाही टोला लगावला.

बाळासाहेब थोरात यांना वैफल्य आले…
बाळासाहेब थोरात यांना आता संपदा पतसंस्थेमुळे वैफल्य आले असून त्यांच्याच एका बँकेच्या चेअरमनने 134 कोटींचा घोटाळा केला असल्याचा व तो आज जेलमध्येसुद्धा असल्याचा घणाघात त्यांनी केला. रावसाहेब पटवर्धनबाबत बोलताना विखे म्हणाले, थोरात यांच्याच नेतृत्वात एक समिती नेमून चौकशी करायला मी तयार असल्याचे ते म्हणाले.