Farmer Jugaad: एक लिटर डिझेलच्या खर्चात होईल दोन एकरची कोळपणी! पहा शेतकऱ्याचा हा अनोखा जुगाड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Jugaad:-शेती करत असताना बऱ्याच कामांसाठी आता यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने वेळ आणि पैसा दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते व काम देखील वेळेत पूर्ण होते. परंतु जर आपण बऱ्याच यंत्रांचा विचार केला तर त्यांच्या किमती जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला अशी यंत्र घेणे परवडत नाही.

त्यामुळे बरेच शेतकरी अनेक प्रकारचे शक्कल लढवतात व घरच्या टाकाऊ वस्तूंपासून किंवा इतर बाबींपासून शेतीच्या वेगवेगळ्या कामात उपयोगी येतील असे जुगाड यंत्र किंवा जुगाड तयार करतात. अशा जुगाडांमुळे शेतीची कामे लवकर होतात व वेळ देखील वाचतो व खर्चामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बचत होते.

आपल्याला माहित आहे की अनेक शेतकऱ्यांनी कोळपणी असेल किंवा फवारणी तसेच पिकांची लागवड इत्यादी करिता अनेक जुगाड यंत्र तयार केलेली आहेत. शेतीमधील अंतर मशागत मध्ये कोळपणीला खूप मोठे महत्त्व असून याच कोळपणीकरिता नांदेड येथील शेतकऱ्यांनी एक अनोखा जुगाड तयार केला आहे. या जुगाडाविषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 शेतकऱ्यांनी कोळपणी करिता तयार केला अनोखा जुगाड

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात असणाऱ्या हुनगुंदा या गावचे जीवन पाटील या शेतकऱ्याने अनोखे जुगाड तयार केले असून ट्रॅक्टरला चक्क कोळपणी यंत्र जोडले आहे.  या जुगाडाच्या सहाय्याने एक लिटर डिझेलमध्ये दोन एकर क्षेत्रातील कोळपणी होत असल्याचे जीवन पाटील यांनी सांगितले.

त्यामध्ये वेळ तसेच कष्टामध्ये देखील  मोठ्या प्रमाणावर बचत होत असून इतर शेतकऱ्यांना हा जुगाड खूप आवडलेला आहे. बरेच शेतकरी सोशल माध्यमांमध्ये बघून किंवा युट्युब सारख्या सोशल माध्यमाचा वापर करून अनेक प्रकारचे जुगाड तयार करतात. बरेच तरुण शेतकरी अशा पद्धतीने जुगाड यंत्र बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर या गावातील बालाजी जाधव या शेतकऱ्याने देखील मोटरसायकलच्या मदतीने कोळपणी यंत्र बनवले असून बैलांच्या मदतीने कोळपणी करताना वेळ आणि अधिक चा खर्च होत असतो. बालाजी जाधव यांनी मोटरसायकलीच्या माध्यमातून कोळपणी करत शेताची व्यवस्थित निगा ठेवली आहे.

व या जुगाडाला अवघा साडेतीनशे रुपये खर्च आल्याचे देखील बालाजी जाधव यांनी सांगितले. हेच काम जर तुम्हाला बैलांच्या साह्याने करायचे असेल तर चार जण लागतात परंतु दुचाकी च्या साह्याने दोनच माणसाच्या पद्धतीने कोळपाणी होते. शिवाय एका दिवसामध्ये चार एकर शेतीची कोळपणी होते असे देखील त्यांनी म्हटले.