Loan Information: ग्रामीण बँक देते सर्व प्रकारची कर्जे! अशापद्धतीने करा घरबसल्या ऑनलाईन अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Information:  भारत देश खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते व या लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय हा कृषी आणि कृषी आधारित इतर व्यवसाय आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्यात येते. खेड्यांचा विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होतो हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी तसेच कामगार वर्गाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिली जातात.

जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी किंवा कृषी आणि कृषी व्यतिरिक्त कामांकरिता पैसा उपलब्ध व्हावा व या माध्यमातून त्यांचा आणि पर्यायाने ग्रामीण भागाचा विकास व्हावा हा उद्देश आहे. यामध्ये अनेक बँका देखील सरकारसोबत महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

बँकांच्या अनुषंगाने विचार केला तर प्रादेशिक ग्रामीण बँक देखील खूप महत्त्वपूर्ण असून 1975 यावर्षी स्थापन झालेल्या ग्रामीण बँका देखील ग्रामीण अर्थव्यवस्थेला खूप मोठा आधार देतात. ग्राहकांना कुठल्याही कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने ग्रामीण बँकेकडे अर्ज करता येतो. या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ग्राहकांना कुठल्याही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील बँकेने उपलब्ध करून दिलेली आहे. याच अनुषंगाने या लेखात आपण ग्रामीण बँकेच्या कर्जसेवा व ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

 ग्रामीण बँकेच्या कर्ज सेवा

ग्राहक त्यांना कोणत्या गोष्टीसाठी कर्ज हवे आहे त्यानुसार ग्रामीण बँकेकडे कर्जासाठी अर्ज सादर करू शकतात व विशेष म्हणजे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतात. ग्रामीण बँकेच्या माध्यमातून खालील प्रकारची कर्जे प्रामुख्याने दिली जातात.

1- होमलोन ग्रामीण बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना नवीन घर बांधण्यासाठी गृह कर्ज सेवा देखील देण्यात येते. यामध्ये एसबीआय ग्रामीण बँक गृह कर्ज हे भारतातील सर्वात मोठे तारण कर्जदार असून भारतातील बऱ्याच कुटुंबांचे घर घेण्याचे स्वप्न या माध्यमातून साकार झाले आहे. गृहकर्जाकरिता ग्राहकांना बँकेकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

यामध्ये नियमित गृहकर्ज तसेच गृहकर्ज शिल्लक राहिले असेल तर ते हस्तांतरण देखील या बँकेच्या माध्यमातून करण्यात येते. यासोबतच एनआरआय होम लोन, रियल्टी होम लोन, होम टॉप लोन, स्मार्ट होम टॉप लोन, कार्पोरेट होम लोन, आदिवासी प्लस, रिव्हर्स लोन यासारखे अनेक सुविधा या माध्यमातून बँक देते.

2- ग्रामीण बँक पर्सनल लोन ग्राहकांना ग्रामीण बँकेच्या कुठल्याही शाखेतून पर्सनल लोनसाठी देखील ऑनलाइन अर्ज करता येणे शक्य आहे. यामध्ये एसबीआय पेन्शन कर्ज, पगारदार कर्मचाऱ्यांना एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट लोन, पूर्व मंजूर झालेले पर्सनल लोन तसेच रोख्यांवर देखील कर्ज मिळते.

3- ग्रामीण बँकांचे वाहनकर्ज ग्रामीण बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना वाहन कर्जाची सुविधा देखील देण्यात येते. यामध्ये तुम्ही नवीन किंवा जुनी कार खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकतात.

त्याकरता तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. या माध्यमातून तुम्ही रॉयल्टी कार कर्ज योजना किंवा सुपर बाईक कर्ज योजना, आश्वस्त कार कर्ज योजना, टू व्हीलर लोन लाईट आणि ग्रीन कार कर्जासारख्या इतर प्रकारचे कर्जासाठी अर्ज करू शकतात.

4- ग्रामीण बँक देते एज्युकेशन लोन विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे याकरिता ग्रामीण बँकेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्जाची सुविधा देखील देण्यात येते. याकरिता  ग्राहकांना बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन एज्युकेशन लोनसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. या माध्यमातून स्कॉलर लोन( आय आय एम, आयआयटी ), विदेशात शिक्षणासाठी साडेसात लाखापेक्षा जास्त कर्ज सुविधा देण्यात येते.

तसेच ग्रामीण बँकेच्या माध्यमातून स्किल लोनच्या माध्यमातून जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच तुम्हाला एखादे एज्युकेशन लोन टेकओव्हर करायचे असेल तर ही देखील सुविधा बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येते. तसेच विदेशात शिकण्याकरिता डॉ. आंबेडकर व्याज अनुदान योजना देखील बँकेचे माध्यमातून राबवण्यात येते.

यासोबतच तुम्हाला सिक्युरिटी लोन म्हणजेच तारण कर्ज देखील देण्यात येते. यामध्ये गोल्ड लोन, शेअर असतील तर त्यावर कर्ज, म्युच्युअल फंड युनिटवर कर्ज मिळते.

 समजा तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर अशा पद्धतीने करा अर्ज

1- तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर ग्रामीण बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.

2- या ठिकाणी गेल्यानंतर या संकेतस्थळाचे होम पेज उघडते व या होम पेजमध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल म्हणजेच वैयक्तिक माहिती या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडते व यामध्ये तुम्हाला लोन ऑप्शनवर क्लिक करून त्यामध्ये तुम्हाला बँकेचे सर्व कर्ज प्रकार दिसतात.

4- त्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचे कर्ज घ्यायचे आहे त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्हाला होम लोन घ्यायचा असेल तर तुम्ही हाऊसिंग लोन या पर्यायावर क्लिक करू शकतात.

5- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल व या उघडलेल्या पेज मध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज एसबीआयच्या पर्याय खाली अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करणे गरजेचे आहे.

6- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर होम लोन अर्जाचा फार्म उघडतो व त्यामध्ये तुमच्याकडे कर्जाचे तीन टप्पे आहेत त्या मध्ये तुम्हाला कर्जासाठी आवश्यक असणारी माहिती नमूद करणे गरजेचे आहे व ही माहिती नमूद केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे.

7- अशा पद्धतीने बँकेकडे ऑनलाइन पद्धतीने तुमचा अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते व नंतर बँक तुमच्या कर्जासंबंधित जी काही माहिती असेल ती तुमच्या मोबाईल नंबर वर पाठवते.

 अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक

या सर्व कर्जाशी संबंधित तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून अधिकची माहिती मिळवू शकतात.

 टोल फ्री क्रमांक1800112211/18004253800