खासदार सुजय विखेंनी विकासाचे कामे करावीत, पक्षपातळीवरचे निर्णय घेऊ नयेत, भाजप नेत्याने फटकारलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पक्षांतर्गतच आव्हान मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राम शिंदे व शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी जी वक्तव्य केली त्याने ही शक्यता अधिक दाट झाली आहे.

आ. संग्राम जगताप यांच्या मुद्द्यावरून फटकारले
मध्यंतरी नगर शहरातील शब्दगंध कार्यक्रमात संग्राम जगताप यांनी भाजपमध्ये यावे, असे खासदार सुजय विखे यांनी वक्तव्य केले होते. या त्यांच्या वक्तव्याचा भाजप शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले की, खासदार विखे हे विकासाचे चांगले कार्य करत असून त्यांनी ते कार्य चांगल्या पद्धतीने करावे. विकासाच्या कामाचं जे काही आहे ते पाहावे. पक्षपातळीवरचे निर्णय आम्हाला घेऊ द्यावेत,

संघटनात्मक जबाबदारी आमच्यावर सोपवली असून ती आम्ही योग्य पद्धतीने पार पाडू असे म्हणत आगरकर यांनी खा. विखे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

आ. राम शिंदे यांचे मोठे आव्हान
एकीकडे खा. सुजय विखे व आ. निलेश लंके यांची फाईट होणार व ही फाईट चांगलीच जड विखे यांना जाणार अशी चर्चा रंगत असतानाच आता विखे यांना पक्षातूनच आव्हान मिळत असल्याचे चित्र आहे.

त्याचे कारण असे की, आ. राम शिंदे हे वारंवार खा. विखे यांवर टीका करत आहेत. तसेच स्वतःच या लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत आहेत. त्यांनी कालच अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत ‘कोणीही ताम्रपट घेऊन भाजपमध्ये आलेला नसून लोकसभेच्या 2014 आणि 2019 निवडणुकीसाठी मी तयारी केलेली होती.

परंतु पक्षाने दोन्ही वेळेस माझ्यावर वेगळी जबाबदारी टाकली व ती मी पूर्ण केली. परंतु आता येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आता मी तयार आहे व तशी तयारी केली आहे.’ त्यामुळे आता खा. विखे यांना पक्षातूनच आव्हान मिळत असल्याचे बोलले जात आहे.