Success Story : ही मुलगी गांडूळ खताच्या विक्रीतून कमावते कोटी रुपये! अशा पद्धतीने करते नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सना खान नावाची ही मुलगी असून 2016 मध्ये इंजिनिअरिंग कंप्लिट केली आणि 2014 पासूनच व्यवसायाला सुरुवात केली. याच सना खानचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये देखील केला आहे. स्वच्छ भारत अभियानाची मेरठ महानगरपालिकेची सना खान या ब्रँड अँबेसिडर देखील आहेत. एवढेच नाहीतर मेरठ महानगरपालिकेच्या लोकल फॉर होकल या उपक्रमाच्या देखील ब्रँड अँबेसिडर आहेत.

सना खान यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अवार्ड देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे. सना खान गांडूळ खत प्रकल्प हे त्यांचे पती आणि त्यांचा भाऊ यांना सोबत घेऊन करतात. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे शेतीविषयक बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी नसताना मेरठ पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी त्यांनी दीड एकर जमीन खरेदी केली या ठिकाणी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला.

सना खान यांचे शिक्षण 2016 मध्ये पूर्ण झाले परंतु 2014 मध्येच त्यांनी  गांडूळ खत प्रकल्पाविषयी माहिती घेतली व व्यवसायिक तत्त्वावर हा व्यवसाय चालू शकतो का याची चाचपणी सुरू केली. जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांना कळले की मार्केटमध्ये हे खत विकले जाते व महत्वाचे म्हणजे सुरुवात केल्यानंतर छोट्या पॅकिंगमध्ये त्यांनी गांडूळ खत विक्रीला सुरुवात केली. एक टन पासून सुरुवात करत करत त्यांचं प्रकल्पातून 10 टन, 50 टन आणि नंतर सरकारी स्तरावर गांडूळ खताचा पुरवठा सुरू केला व अशा पद्धतीने पुरवठा साखळी विकसित केली.

 अशा पद्धतीने आहे सना खान यांचा गांडूळ खत प्लांट

सना खान यांनी गांडूळ खत प्रकल्प हा सगळा स्वयंचलित रीतीने उभारला असून मजुरांची गरज कमीत कमी करण्यात आलेली आहे. फक्त पॅकिंग एरिया आणि कॉलिटी मेंटन करण्यासाठी त्यांना मजुरांची आवश्यकता भासते. 400 टन गांडूळ खताची व्यवस्थित प्रक्रिया एका मशीनच्या माध्यमातून केली जाते. सुरुवात करताना त्यांनी कुठल्याही यंत्राशिवाय प्लांट ची सुरुवात केली होती. गांडूळ खत व्यवस्थित गाळण्याकरिता त्यांनी अगोदर गाळण्याचा वापर केला. नंतर त्यांनी तीन बाय तीन साईजची एक छोटी मशीन विकत घेतली त्याची किंमत होती पंधरा ते सोळा हजार रुपये.

त्या मशीनच्या सहाय्याने सहाशे किलो गांडूळ खतावर व्यवस्थित प्रक्रिया केली जात होती. त्यानंतर 50 हजार रुपयांचे भांडवल टाकून त्यांनी त्यापेक्षा मोठी मशीन घेतली व आता त्यांच्या प्लांटमध्ये पाच ते सहा लाखाची एक महत्वाची मशीन असून यामध्ये ड्रायर आणि पॅकेजिंग मशीन पकडून 20 लाखापर्यंत खर्च करण्यात आला आहे.हे मशीन ग्राइंडर टाईप मध्ये असून ग्राइंडर मध्ये गांडूळ खत टाकल्यानंतर ते व्यवस्थित क्रश केले जाते व त्यानंतर गाळप प्रक्रिया करता जाते. त्यानंतर प्रक्रिया झालेले गांडूळ खत आवश्यक घटक मिसळून पॅकिंग साठी तयार होते.

प्रक्रियेच्या अगोदर गांडूळ खताची कॉस्टिंग

प्रक्रियेच्या अगोदर गांडूळ खताची कॉस्टिंग पकडली तर अडीच ते तीन रुपये प्रति किलो इतकी येते. यामध्ये शेणाची खरेदी जर बाहेरून करत असाल तर ही कॉस्ट येते 50 पैसे किलोने शेण खत विकत घेतले जाते. गांडूळ खत प्रकल्पामध्ये मजुरा वरील खर्च व कच्च्या मालावरील खर्च हे मुख्यत्वे करून प्रमुख उत्पादन खर्च असतो. सना खान यांच्या मते गांडूळ खताची एका किलोची कॉस्टिंग ही मजुरांवर आधारित आहे.

 प्रकल्पाची सुरुवात कशी केली?

नऊ वर्षा अगोदर यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला व पन्नास बेड च्या साह्याने या प्रकल्पाची सुरुवात केली. बेड तयार करताना ते 30 बाय चार फुटाची बेडची साईज ठेवतात.

 अशा पद्धतीने बनवतात बेड

यामध्ये पहिली पायरी म्हणजे सगळ्यात खाली प्लास्टिक म्हणजेच पॉलिथिनचा पेपर अंथरला जातो. म्हणजेच आपण जी पावसाळ्यामध्ये काळा रंगाचे ताडपत्री वापरतो त्याचा वापर सगळ्यात खाली केला जातो. नंतर दुसरी पायरी म्हणजे प्लास्टिकच्या कागदावर शेणाचा थर दिला जातो. या पूर्ण बेडला एक सेमी सर्कल म्हणजेच अर्धवर्तुळाकार शेप दिलेला असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये शेणखतावर गांडूळ टाकले जातात व त्यानंतर मल्चिंग पेपर वरून अंथरला जातो व त्यानंतर व्यवस्थितपणे पाण्याचा शिडकाव केला जातो. त्यानंतर फक्त तापमानावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते.

 एक बेड तयार करण्यासाठी लागणारा खर्च

30 बाय चार फुटाचा बेड तयार करण्यासाठी साडेचारशे रुपयाचा पॉलिथिन पेपर लागतो. म्हणजेच अडीचशे मायक्रॉनचा कागद यासाठी लागतो. तसेच शेणाचा खर्च हा एका बेड साठी प्रति किलो 40 ते 50 पैसे इतका येतो. प्रमाणे सना खान यांना सहाशे रुपयांचे शेण लागते. एका बेड साठी दीड टन शेणाची आवश्यकता भासते. नंतर गांडूळ खतांसाठी लागणारी जी काही गुंतवणूक लागते ती फक्त एका वेळेसच करावे लागते.

या एका बेड साठी 30 किलो गांडूळांच्या आवश्यकता असते.30 रुपये प्रति किलो गांडूळ याप्रमाणे एका बेड करता 9 हजार रुपयांचे गांडूळ लागतात.त्यानंतर भाताचा भुसा 250 रुपयाचा लागतो. जवळजवळ साधारणपणे 30 बाय चार फुटाचा एका बेड करता दहा हजार रुपये इतका खर्च येतो.

 एका बेड पासून मिळणारे उत्पन्न

या 30 बाय चार फुटाच्या एका बेड पासून मिळणारे मार्जिन हे 50 ते 60% असते असे सना खान यांनी आवर्जून सांगितले. एका बेड मधून साडेसातशे किलो गांडूळ खताचे उत्पादन मिळते. त्याच्यानंतर गांडूळ खताची विक्री सहा रुपये प्रति किलो ते पंचवीस रुपये प्रति किलो प्रमाणे त्या करतात. गांडूळ खताच्या एका किलोची किंमत हे पॅकिंगवर आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अवलंबून आहे असे देखील त्यांनी सांगितले. परंतु कुठलाही व्हॅल्यू ॲडेड म्हणजेच कुठलाही घटक मिक्स न करता प्लेन गांडूळ खत ते सहा रुपये ते वीस रुपये प्रति किलोच्या आसपास विक्री करतात.

 महिन्याचा या गांडूळ खताचा खर्च

या गांडूळ खत प्रकल्पाची एका महिन्यातील लेबर कॉस्ट म्हणजेच मजुरावरील खर्च पाहिला तर तो साडेतीन लाख रुपयाच्या आसपास आहे. तसेच शेणाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना एक ते दीड लाख रुपये खर्च होतो. पॅकिंग करणारा कॉन्ट्रॅक्टर वर देखील तीन लाख रुपये खर्च होतो. विज बिल व इतर खर्च पकडून महिन्याला सहा ते सात लाख रुपये इतका खर्च त्यांना येतो. जर सना खान यांची गांडूळ खत विक्री पकडली तर 400 किलोच्या आसपास होते.

जर सना खान यांच्या गांडूळ खताचे ग्राहक पाहिले तर ते प्रामुख्याने शहरी भागातील नर्सरी व्यावसायिक  तसेच खतांची दुकाने, बरेच शेतकरी आणि सरकारी टेंडर इत्यादी माध्यमातून विक्री केली जाते. अशा माध्यमातून त्यांचा वार्षिक टर्नवर पाहिला तर तो दहा कोटीच्या पुढे आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये एक अत्याधुनिक  प्रयोगशाळा देखील असून यात्रे शाळा उभारणी करिता त्यांना चार ते पाच लाख रुपये खर्च आलेला आहे. त्यामध्ये प्रकल्पासाठीच्या आवश्यक गोष्टी टेस्टिंग केल्या जातात. अशाप्रकारे गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून सना खान यांनी चांगली आर्थिक समृद्धी मिळवली आहे.