Tourist Place : ऐतिहासिक आणि निसर्गाचा वारसा असलेली पुण्यातील ही स्थळे पहा आणि एक दिवसाच्या ट्रिपचा आनंद घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tourist Place :- पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असून अनेक ऐतिहासिक परंपरा देखील पुणे जिल्ह्याला लाभलेली आहे.स्वराज्याच्या खानाखुणा म्हणजेच छत्रपती शिवाजी राजांचे अनेक गड किल्ले पुणे जिल्ह्यात आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्याचा विचार केला तर अनेक निसर्गसौंदर्याने नटलेली स्थळे या जिल्ह्यात असल्यामुळे पुणे जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे.

जर तुमचा कुटुंब किंवा मित्रांसमवेत जर फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही पुणे जिल्ह्याची व शहराची निवड करू शकतात. अगदी पुणे शहरात देखील अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळ असून एक दिवसाच्या ट्रिपसाठी पुणे शहरातच तुम्ही चांगल्या ठिकाणांना भेट देऊ शकता. याचा अनुषंगाने आपण पुण्यातील काही पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.

 पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1- आगाखान पॅलेस ऐतिहासिक महत्त्व असलेले हे ठिकाण पुण्यात असून जेव्हा ब्रिटिशांच्या  विरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता त्या कालावधीमध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्याकरिता तुरुंग व्यवस्था म्हणून आगाखान पॅलेसला खूप महत्त्व आहे. या पॅलेसला गांधींचे स्मारक म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या जीवनाशी निगडित अनेक प्रकारचे छायाचित्रे आणि त्यांच्या वैयक्तिक वापरातील  विविध वस्तूंचे प्रदर्शन देखील बघायला मिळते.

या ठिकाणी जर तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही सुट्ट्या वगळता सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान केव्हाही जाऊ शकतो. आगाखान पॅलेस पाहण्यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क आकारले जाते व ते म्हणजे भारतीयांकरिता 15 रुपये आणि लहान मुलांकरिता पाच रुपये आणि जर पर्यटक विदेशी असतील तर त्यांच्याकरता दोनशे रुपये शुल्क आकारले जाते.

Aga Khan Palace Pune Timings, Entry Ticket Fee, Opening & Closing Time,  Holidays & Phone Number - Pune Tourism 2023

2- सिंहगड किल्ला सिंहगड किल्ला हा पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी तुम्ही अनेक प्रकारचे निसर्ग सौंदर्य पाहू शकता. जर आपण मराठ्यांचा इतिहास पाहिला तर सिंहगड किल्ल्याची भूमिका खूप महत्त्वपूर्ण होती. हे ठिकाण पिकनिक आणि ट्रेकिंग करिता खूप लोकप्रिय असून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये या किल्ल्याची गणना होते. तुम्हाला या ठिकाणी इतिहासातील अनेक अवशेष बघायला मिळतात.

हे अवशेष पाहून मन भरून जाते. तसेच या टेकडीच्या पायथ्याशी जेव्हा तुम्ही याल तर तुम्हाला स्थानिक खाद्यपदार्थांची चव चाखता येते. सिंहगड किल्ला हा वर्षभर पर्यटकांसाठी खुला असतो. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत तुम्ही भेट देऊ शकता. तसेच या ठिकाणी पार्किंगसाठी शुल्क देणे गरजेचे असून बाईकला वीस रुपये आणि फोर व्हीलर ला पन्नास रुपये इतके शुल्क आकारले जाते.

Sinhagad Fort Pune Timings, Entry Fee, Ticket Cost Price; Sinhagad Fort  Opening & Closing Time, Holidays & Phone Number - Pune Tourism 2023

3- शनिवार वाडा हा एक ऐतिहासिक वाडा असून पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. शनिवार वाडा हा पेशवांचा निवासस्थान म्हणून ओळखले जाते व याला एक इतिहासाची समृद्ध जोड आहे. मराठी स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट नमुना म्हणून शनिवार वाड्याला बघता येईल. शनिवार वाड्याचा इतिहास जिवंत राहावा याकरिता त्या ठिकाणी लाईट आणि साऊंड शो बनवण्यात आलेला आहे.

या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायचे असेल तर सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत तुम्हाला जाता येते. या ठिकाणी जाण्यासाठी शुल्क आकारले जाते व ते म्हणजे भारतीयांकरिता पाच रुपये आणि विदेशी पर्यटकांकरिता 125 रुपये इतके शुल्क आहे. लाईट अँड साऊंड शोची किंमत ही 25 रुपये आहे.

SHANIWAR WADA - A GLORIOUS PALACE OF THE PESHWAS - Pedal And Tring Tring

4- राजीव गांधी प्राणीसंग्रहालय राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुण्यातील कात्रज परिसरात असून 130 किलोमीटर परिसरावर हे वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला सापांच्या विविध जाती आणि जंगलातील इतर प्राणी देखील बघायला मिळतात. हे प्राणी संग्रहालय जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुमच्याकडे एक दिवस असणे गरजेचे आहे. याठिकाणी लहान मुले आणि विद्यार्थी वर्गाकरिता दहा रुपये आणि भारतीय पर्यटकांसाठी 40 रुपये शुल्क आकारले जातात.

विदेशी पर्यटकांसाठी शंभर रुपये एवढे शुल्क या ठिकाणी द्यावे लागते. फोटोग्राफी कॅमेरा करता 50 तर व्हिडिओग्राफी करायचे असल्यास दोनशे रुपये या ठिकाणी शुल्क देणे गरजेचे आहे. दिव्यांग व्यक्तींकरता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. विशेष म्हणजे बुधवारी हे उद्यान बंद असते व इतर वेळेस सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच या कालावधीत तुम्हाला हे उद्यान पाहता येते.

Rajiv Gandhi Zoological Park Pune Timings, Entry Fee, Ticket Cost Price; Rajiv  Gandhi Zoological Park Opening & Closing Time, Holidays & Phone Number -  Pune Tourism 2023

5- पाताळेश्वर गुहा पाताळेश्वर गुहा या वास्तुशिल्पाचा एक चमत्कार म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सदर गुहा हा आठव्या शतकात उभारण्यात आल्याचे मानले जाते. या ठिकाणी जे काही कोरीव काम करण्यात आले आहे ते अतिशय गुंतागुंतीचे असून खूप सुंदर आहे. या ठिकाणी तुम्ही दररोजच्या गजबजलेल्या ठिकाणाहून शांत वातावरणाचा अनुभव घेऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच च्या दरम्यान तेव्हाही भेट देऊ शकता. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.

Pune's Pataleshwar Cave: Glory In Greyscale - Outlook Traveller