Health Tips: पाणी पिऊन फिट रहायचे असेल तर ‘अशा पद्धती’ने प्या पाणी! शरीर राहील तंदुरुस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips:- शरीराच्या उत्तम आणि सुदृढ आरोग्याकरिता संतुलित आहार जितका महत्त्वाचा आहे तितकेच अनन्यसाधारण महत्त्व पाण्याला आहे. पाण्याला जीवन म्हटले जाते. कारण मनुष्याच्या जीवनासाठी पाणी हे अत्यावश्यक असून संतुलित आहारासोबत शरीर फिट राहण्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

परंतु आपण जो काही आहार घेतो तो आहार घेताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते. त्याच पद्धतीने पाणी पिताना देखील ते योग्य वेळी पिणे खूप गरजेचे असते. त्यामुळे पाणी कधी प्यावे व कधी पिऊ नये याची माहिती देखील असणे खूप गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून या लेखात आपण महत्त्वाची माहिती घेऊ.

 कोणत्या गोष्टी आधी पाणी पिणे आहे फायद्याचे?

आयुर्वेदिक तज्ञ असलेल्या दीक्षा भावसार यांनी इंस्टाग्राम अकाउंट वर यासंबंधीचे एक महत्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. त्यानुसार….

1- सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे शरीराला आहे उत्तम तुम्हाला शरीराला हायड्रेट ठेवायचे असेल तर सकाळी पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. रात्री आपण जेव्हा जेवण करतो व त्यानंतर आपण सकाळी नाष्टा करतो.

परंतु त्याआधी तुमच्या सकाळची सुरुवात किंवा दिवसाची सुरुवात नेहमी एक ग्लास पाण्याने करणे खूप गरजेचे आहे. रात्रीच्या जेवणानंतर आपण काहीच खाल्लेले नसते त्यामुळे सकाळी पाणी किंवा कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पिणे खूप फायद्याचे ठरू शकते.

2- जेवणाच्या आधी पाणी पिणे फायद्याचे जर तुम्ही जेवण करण्या अगोदर पाणी प्यायले तर त्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट साफ व्हायला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते व त्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचायला मदत होते. एवढेच नाही तर तुमचे वजन कमी करण्याला देखील यामुळे चांगली मदत मिळू शकते.

याकरिता जेवण करण्याच्या 30 मिनिट अगोदर आणि दिवसभरामध्ये पाचशे मिली लिटर पाणी पिणे शरीरासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये जर बारा आठवड्यांपर्यंत रेगुलर तुम्ही अशा पद्धतीने फॉलो केले तर वजन कमी व्हायला देखील वाढण्यास मदत होते.

3- झोपण्याअगोदर पाणी प्यावे जर तुम्ही झोपण्यापूर्वी पाणी पिले तर रक्ताभिसरण संस्था सुधारते व हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर किंवा ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पाणी पीत राहावे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते व पोटाचे विकार देखील दूर राहतात.

4- आंघोळ करण्याआधी पाणी पिणे फायद्याचे तुम्ही जर एक ग्लासभर कोमट पाणी पिले तर रक्तदाब लेवल कमी करण्यामध्ये मदत होते. त्यामुळे तुम्ही जेवण करण्याआधी एक ग्लास कोमट पाणी आवश्यक आहे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन करण्यास मदत होते व त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण होत नाही.