Health Tips: अंगात ताप भरला तर नका करू काळजी! ‘या’ आयुर्वेदिक उपायांनी झटक्यात ताप होईल कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips:- शरीराच्या आरोग्यावर बदलते तापमान तसेच हवामानाचा ताबडतोब परिणाम होत असतो. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला आणि ताप या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सामान्य समजल्या जाणाऱ्या समस्या उद्भवतात.

परंतु यातील ताप ही समस्या जरी सामान्य असली परंतु  यामध्ये शरीराचे तापमान वाढते व व्यक्तीला अचानक अशक्तपणा जाणवायला लागतो. तसे पाहायला गेले तर ताप येणे ही काही मोठी समस्या नाही. परंतु जास्त कालावधी करिता जर ताप राहिला तर मात्र त्रास व्हायला लागतो.

परंतु जास्त ताप वाढण्याअगोदर जर काही घरगुती उपचार केले तर अंगात भरलेला ताप उतरू शकतो व व्यक्ती बरा होऊ शकतो.या दृष्टिकोनातून या लेखात आपण काही महत्त्वाचे सोपे उपाय बघणार आहोत. त्यामुळे अंगात भरलेला ताप कमी होण्यास मदत होईल.

 अंगात ताप भरला तर हे साधे उपाय करा

1- थंड पाण्याच्या कॉम्प्रेसचा वापर( थंड पाण्याच्या घड्या)- प्राचीन कालावधीमध्ये ताप कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या कॉम्प्रेसचा वापर केला जात असे. म्हणजेच यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाण्यामध्ये मीठ मिक्स करून थंड पाण्यात कापड बुडवून तो ओला कापड कपाळावर ठेवला जातो

व यामुळे ताप लवकर निघण्यास मदत होते. अशा कापडाच्या घड्या या कपाळच नाहीतर तळवे, मान यावर ठेवून देखील तापाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

2- आले पुदिन्याचा वापर यामध्ये पाण्यात थोडे आले आणि पुदिन्याचे पाने घालून ते पाणी चांगले उकळून घ्यावे व दिवसातून दोनदा ते प्यावे. यामुळे ताप तर कमी होतोच परंतु पचनाशी काही समस्या असेल तर ती देखील दूर होते.

3- लसणाचे पाणी आयुर्वेदामध्ये लसणाला खूप महत्त्व आहे व यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. याच गुणधर्मांचा वापर हा ताप कमी करण्यासाठी करता येऊ शकतो.

ताप जर जास्त असेल तर लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या ठेचून घ्याव्यात व त्या पाण्यात उकळा किंवा कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्याव्यात. त्यानंतर हे पाणी सुपप्रमाणे प्यावे.त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

4- तुळशीची पाने तुळस ही वनस्पती आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असून आरोग्याची संबंधित असलेल्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.

ताप कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करायचा असेल तर ती चावून खावीत. तसेच मधात मिसळून खाणे देखील खूप फायद्याचे ठरते.

याशिवाय तुळशीच्या पानांपासून बनवलेले उकडीचे औषध हे तापासोबत सर्दी आणि घसा दुखीवर देखील रामबाण इलाज आहे.

( वरील माहिती ही वाचकांच्या माहितीस्तव सादर करण्यात आलेली आहे. कुठलाही उपचार आणि आहारात बदल करण्याअगोदर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)