Heart Care Tips : ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होणारच नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Heart Care Tips :- हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रेटींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या हल्ली रोजच ऐकायला मिळतात. बहुतांश घटनांमध्ये दररोज व्यायाम करणारे आणि शरीराचा बांधा योग्य असणारेही दिसून येतात. मग तरी अशा तरुणांना हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो?

किशोरवयीन मुले कार्बोनेटेड पेय, बर्गर, पिझ्झा, पास्ता, समोसे, वडापाव आणि यासारखा आहार सर्रास करतात. या पदार्थांमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, आणि ट्रान्स फॅट्स देखील यांचे प्रमाण अधिक असते. या आहारामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तरुणांनी फळे, भाज्या, शेंगदाणे, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ असा निरोगी आणि पौष्टिक आहार घ्यायला हवा.

बैठी जीवनशैली : बैठी जीवनशैली ही आणखी एक समस्या आहे. ऑफिसमधील कामाचे तास वाढणे, ओटीटीचे व्यसन आणि आळस हे तरुण व्यायाम न करण्याचे प्रमुख कारण आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनने आठवड्यातून ५ दिवस ३५ मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याची शिफारस केली आहे. दररोज ‘कार्डिओ’ व्यायाम म्हणून वेगाने चालणे पुरेसे आहे. आठवड्यातून तीनदा हलक्या वजनाचे व्यायाम करावेत, जेणेकरून बॉडी टोनिंगमध्ये फायदेशीर ठरते.

अतिव्यायाम : अतिव्यायाम करणेही तितकेच घातक आहे. मॅरेथॉनमध्ये धावणे, जास्त वजन उचलणे किंवा जिम प्रशिक्षकांनी सुचवलेले हाय इन्टेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग यांसारख्या फॅड्समुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे

अपुरी झोप : हे देखील हृदयविकारास कारणीभूत ठरते. रात्री उशिरापर्यंत पार्टी करणे, दारू, कामाशी संबंधित ताण, रात्रपाळी इत्यादी व्यक्तीच्या झोपेच्या पद्धतींवर परिणाम करतात. असे नोंदवले गेले आहे की ४८ तासांच्या झोपेच्या अभावानंतर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटना दुप्पट घडतात. त्यामुळे झोप अतिशय महत्त्वाची आहे.

मधुमेह उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाब किंवा मधुमे यांसारख्या आजारांवर औषधे घेण्यास निष्काळजीपणा केला जातो. तरुणांमधील हायपरटेन्शन आता सामान्य ठरत आहे.

धोका टाळण्यासाठी :
१. संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्या. तिशीनंतर वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करा.
२. जंक फूड टाळा. संतुलित आहार, ८ तास झोप घ्या
३. स्वतःच्या मनाने औषधोपचार किंवा जिम सप्लिमेंट्सचा वापर करू नका.
४. आठवड्यातून ५ दिवस किमान ३४ मिनिटे चाला. आठवड्यातून ३ दिवस वेट ट्रेनिग प्रशिक्षण घ्या.
५. अतिव्यायाम करू नका.