Weight Loss Tips: वाढत्या वजनाने त्रस्त आहात का? ‘या’ वेळेला कराल जेवण तर वजन होईल झटपट कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weight Loss Tips:- जीवनामध्ये जसा प्रत्येक गोष्टीला एक नियम किंवा एक बंधन असते व त्यानुसार आपल्याला वागावे लागते. त्याचप्रमाणे शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता तुम्हाला तुमच्या रात्री झोपण्यापासून तर सकाळी उठण्यापर्यंत, सकाळच्या नाश्ता पासून तर दुपार व रात्रीच्या जेवणापर्यंतच्या वेळा या एका ठराविक कालावधीत किंवा नियमानुसार पूर्ण करणे खूप गरजेचे असते.

कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो. हीच बाब अगदी जेवणाला सुद्धा लागू होते. समजा तुम्ही जर जेवणाच्या वेळा चुकवल्या आणि झोप जर वेळेवर घेतली नाही तर याचा निश्चितच विपरीत परिणाम हा आरोग्यावर होत असतो.

दैनंदिन जीवनातील या सगळ्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे व्यक्तींना अनेक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे व त्यातच जर आपण वाढत्या वजनाची समस्या पाहिली तर यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. कारण  आरोग्य आणि जेवण करण्याची वेळ याचा सरळ संबंध येतो.

कामाच्या ताणामुळे किंवा कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बरेच लोकांचे जेवण हे रात्री 10 किंवा 11 नंतर होते. परंतु याचा विपरीत परिणाम हा आरोग्यावर होत असतो. या अनुषंगाने जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही रात्रीचे जेवण अगदी वेळेवर करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे यासंबंधीची महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेऊ.

 जेवण करा परंतु या वेळेनंतर नाही

जर आपण रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ पाहिली तर ती साधारणपणे सायंकाळी सात ते आठ ही आहे. यावेळेमध्ये जर जेवण केले तर अन्न पचायला तर खूप मोठी मदत होते. यामुळे पोटाचे कुठल्याही प्रकारचे विकार आपल्याला त्रास देत नाही व झोप देखील वेळेवर लागते.

ज्या लोकांची रात्री झोपण्याची वेळ दहा ते अकरा वाजेपर्यंत आहे अशा व्यक्तींनी रात्रीचे जेवण सात ते आठ या वेळेदरम्यान करणे गरजेचे आहे. बरेच लोकं हे रात्री दहा वाजेच्या आत जेवण करत नाही व त्यांचे पुढचे सगळं शेड्युल बिघडते. जेव्हा आपण उशिरा जेवण करतो तेव्हा निश्चितच उशिरा झोपतो. त्यामुळे चांगल्या आरोग्याकरिता वेळात वेळ काढून योग्य वेळेवर जेवण करणे खूप गरजेचे आहे.

तुमची रात्री झोपण्याची वेळ दहा ते अकरा नंतर असेल तरी देखील तुम्ही वेळेवर जेवण करणे खूप गरजेचे आहे. कामात व्यस्त असाल तर सात ते आठ वाजे दरम्यान जेवायला वेळ मिळाला नाहीतर कमीत कमी नऊ वाजेच्या दरम्यान जेवण करणे गरजेचे आहे.

त्यामुळे जीवन व्यवस्थित पचते व रात्री हलका पदार्थांचा जर जेवणात समावेश केला तर  फायदा होतो आणि भरपेट न खाता पोटाचा पोर्शन कंट्रोलमध्ये राखून खाणे खूप गरजेचे आहे. तुमची झोपायची जी वेळ असेल तिच्या दोन ते तीन तास तर जेवण केले तर ते पचायला व्यवस्थित असते व पोट  फुगणे तसेच बद्धकोष्ठता,गॅसेसचा त्रास होत नाही.

त्यांना डायबिटीस किंवा हृदयाशी निगडित काही समस्या आहे त्यांनी तर वेळेवर जेवण करणे खूप गरजेचे आहे. तसेच झोपण्याच्या तीन तास आधी जेवण केले तर शरीर तयार होणाऱ्या इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करते. त्यामुळे पोटातील अन्नाचे ग्लुकोज मध्ये योग्य पद्धतीने रूपांतर होते व रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.