7th Pay Commission : लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार लाखो रुपये !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई तसेच घरभाडे भत्ता हे होय. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची अनेक दिवसापासूनची प्रतीक्षा केंद्र सरकारच्या माध्यमातून संपवण्यात आली असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ घोषित केली.

केंद्रीय कर्मचारी यांना अगोदर 42 टक्के या दराने महागाई भत्ता मिळत होता. त्यामध्ये आता चार टक्क्यांची वाढ केल्यामुळे तो 42 ऐवजी 46 टक्के इतका झालेला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना जे काही लाभ दिले जातात ते सातव्या वेतन आयोग अंतर्गत दिले जातात.

एवढेच नाही तर ही महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. कारण ही वाढ एक जुलै 2023 पासून लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक संघटनांची जी अनेक दिवसांची कोरोना कालावधीतील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देण्याची मागणी आहे त्या बाबतीत देखील केंद्र सरकार लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महागाई भत्ता थकबाकीची रक्कम लवकरच मिळणार

सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारच्या माध्यमातून लवकरच पाठवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असून कर्मचारी आणि पेन्शन धारक संघटनांची ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.

जर ही थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळाली तर कर्मचारी व पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा होणे शक्य आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता थकबाकीची रक्कम पाठवण्याची तारीख अजून पर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही.

परंतु अनेक मीडिया रिपोर्टचा हवाला घेतला तर लवकरात लवकर ही रक्कम दिली जाईल अशी शक्यता आहे. एक जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कोरोना कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीचे पैसे दिले गेलेले नाहीत.

ते लवकरात लवकर मिळावे अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून केली जात आहे.त्यामुळे केंद्र सरकार याबाबतीत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतला गेला तर उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन लाख 18 हजार रुपये जमा होणे शक्य आहे. नवीन वर्षाच्या अगोदर सरकारकडून ही मोठी घोषणा होईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील सरकारकडून वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात देखील विक्रमी वाढ होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये 2.60 ते 3.0 पट वाढ होण्याची शक्यता आहे. जर ही वाढ झाली तर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना फायदा होणार हे मात्र निश्चित आहे. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारकडून यासंबंधीची घोषणा होऊ शकते अशी देखील शक्यता आहे.

त्यामुळे आता महागाई भत्ता थकबाकीची रक्कम आणि फिटमेंट फॅक्टर याबाबत केंद्र सरकार येणाऱ्या दिवसात काय निर्णय घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.