DA Hike : जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात होऊ शकते तब्बल ‘इतकी’ वाढ,केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वर्ष जाईल आनंदात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike:- नुकताच केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्यांमध्ये चार टक्क्यांची वाढ करत तो आता 46% इतका करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सणासुदीच्या कालावधीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट मिळाले असेच म्हणावे लागेल.

आता यापुढील महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. परंतु यामध्ये जर आपण अंदाजे आकडेवारी पाहिली तर ही होणारी वाढ ही आतापर्यंतचे सर्वात मोठी वाढ असू शकते.

महागाई भत्त्यात पाच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष अनेक अर्थाने महत्त्वाचे असणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असून यावेळी जर आपण ट्रेंड पाहिला तर गेल्या चार वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झालेली आहे.

परंतु या नवीन वर्षामध्ये महागाई भत्त्यात आतापर्यंतचे सर्वात मोठी म्हणजेच 5% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याचा जर ट्रेंड पाहिला तर महागाई भत्ता 51% पर्यंत पोहोचू शकतो असे तज्ञांचे मत आहे. असे झाल्यास पाच टक्क्यांची वाढ ही एक मोठी झेप ठरेल.

महागाई भत्ता एआयसीपीआय निर्देशांकावरून मोजला जातो. निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तुलनेत किती वाढला पाहिजे हे आपल्याला समजते. सध्याची परिस्थिती पाहिला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर साठी एआयसीपी या निर्देशांक जारी करण्यात आले आहेत.

निर्देशांकाचा हा नवीनतम आकडा 137.5 अंकांवर आहे व यामुळेच महागाई भत्ता 48.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर मध्ये हा आकडा 49.30 टक्क्यांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर चा डेटा जानेवारी 2024 मध्ये किती प्रमाणात महागाई भत्ता वाढू शकतो हे ठरवेल. परंतु त्या अगोदर आपल्याला डिसेंबर 2023 च्या एआयसीपीआय निर्देशांकाची वाट पाहावी लागणार आहे.

महागाई भत्त्यात होईल मोठी वाढ

सातव्या वेतन आयोग अंतर्गत एआयसीपीआय क्रमांक जुलै ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवेल व महागाई भत्ता आता 48.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. अजून तीन महिन्यांचा आकडा यायचा बाकी आहे.

या तीन महिन्याच्या आकड्यांमध्ये 2.50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ दिसू शकते. यामध्ये जर महागाई भत्ता कॅल्क्युलेटर चा विचार केला तर यामध्ये उर्वरित महिन्यात एक-एक पॉईंटची वाढ दर्शवत आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ दिसून आली आहे.