MP In Maharashtra: सध्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती आहेत खासदार? कोणत्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण आहे? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MP In Maharashtra:- सध्या महाराष्ट्राचे राजकारण पाहिले तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघताना दिसत आहे. तसेच पक्षांतराच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेते भाजपामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत.

यामध्ये काही खासदारांचाही समावेश आहे तर काही आमदारांचा देखील समावेश आहे. या सगळ्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर येणारी लोकसभेचे निवडणूक ही चुरशीची होणार हे मात्र निश्चित. जर आपण सध्याची महाराष्ट्रातील खासदारांची स्थिती पाहिली तर  एकूण संख्या 48 आहे.

म्हणजेच  महाराष्ट्रातून लोकसभेच्या 48 खासदार निवडून जातात. महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत  भाजप शिवसेना युतीने त्यावेळी सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या व यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळवता येणे शक्य झाले होते.

तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. एमआयएमला एक आणि अपक्ष एक अशा एकूण 48 जागा पूर्ण झाल्या होत्या. या अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील विद्यमान 48 खासदारांची यादी व त्यांचा मतदारसंघ आणि पक्षाबद्दल माहिती घेणार आहोत.

 महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी

1- धुळे लोकसभा मतदारसंघ खासदार सुभाष भामरे आणि त्यांचा पक्ष आहे भाजप

2- जळगाव लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत उन्मेश पाटील आणि पक्ष आहे भाजप

3- नंदुरबार लोकसभा मतदारसंघ या ठिकाणच्या खासदार आहेत हिना गावित आणि पक्ष आहे भाजप

4- बुलढाणा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत प्रतापराव जाधव आणि ते शिवसेना पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते परंतु आता शिंदे गटात आहेत.

5- रावेर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणच्या खासदार आहेत रक्षा खडसे व त्यांचा पक्ष आहे भाजप

6- अमरावती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणच्या सध्याच्या खासदार आहेत नवनीत कौर राणा

7- अकोला लोकसभा मतदारसंघ सध्या या ठिकाणचे खासदार आहेत संजय धोत्रे व त्यांचा पक्ष आहे भाजप

8- वर्धा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत रामदास तडस व त्यांचा पक्ष आहे भाजप

9- रामटेक लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत कृपाल तुमाने आणि ते आता शिंदे गटात आहेत.

10- नागपूर लोकसभा मतदारसंघ सध्याचे या ठिकाणचे खासदार आहेत नितीन गडकरी व त्यांचा पक्ष आहे भाजप

11- भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत सुनील मेंढे व त्यांचा पक्ष आहे भाजप

12- गडचिरोलीचिमूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत अशोक नेते व त्यांचा पक्ष आहे भाजप

13- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत बाळू धानोरकर त्यांचा पक्ष होता काँग्रेस मात्र ही जागा सध्या रिक्त

14- यवतमाळवाशिम लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत भावना गवळी व हे शिवसेनेतून निवडून आले होते. सध्या शिंदे गटात आहेत.

15- हिंगोली लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत हेमंत पाटील.आता सध्या शिंदे गटात आहेत.

16- परभणी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत संजय जाधव.

17- नांदेड लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर व यांचा पक्ष आहे भाजप

18- जालना लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत रावसाहेब दानवे व त्यांचा पक्ष आहे भाजप

19- औरंगाबाद त्या ठिकाणचे खासदार आहेत इम्तियाज जलील व त्यांचा पक्ष आहे एमआयएम

20- दिंडोरी लोकसभा मतदारसंघ ठिकाणाच्या खासदार आहेत डॉ.भारती पवार व त्यांचा पक्ष आहे भाजप

21- नाशिक लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत हेमंत गोडसे व त्याआधी शिवसेनेत होते व आता सध्या गटात आहेत.

22- पालघर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत राजेंद्र गावित व हे आधी शिवसेनेत होते व आता शिंदे  गटात आहेत.

23- भिवंडी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणाचे खासदार आहेत कपिल पाटील व त्यांचा पक्ष आहे भाजप

24- कल्याण लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे व ते आधी शिवसेनेत होते आता सध्या शिंदे गटात

25- ठाणे लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत राजन विचारे सध्या शिवसेना ठाकरे गट

26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत गोपाळ शेट्टी व पक्ष आहे भाजप

27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत गजानन कीर्तिकर व हे आधी शिवसेनेत होते परंतु आता शिंदे गटात

28- मुंबई ईशान्य( उत्तर पूर्व ) लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत मनोज कोटक व त्यांचा पक्ष आहे भाजप

29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत पुनम महाजन व पक्ष आहे भाजप

30- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत राहुल शेवाळे. आधी शिवसेनेत होते व आता शिंदे गटात

31- दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत अरविंद सावंत आणि त्यांचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

32- रायगड लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत सुनील तटकरे व हे आधी राष्ट्रवादीत होते व आता अजित पवार गटात

33- मावळ लोकसभा मतदारसंघया ठिकाणचे खासदार आहेत श्रीरंग बारणे व हे आधी शिवसेनेत आता हे शिंदे गटात

34- पुणे लोकसभा मतदारसंघया ठिकाणचे खासदार होते गिरीश बापट व त्यांचा पक्ष होता भाजप परंतु सध्या ही जागा रिक्त आहे.

35- बारामती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणच्या खासदार आहेत सुप्रिया सुळे व त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार

36- शिरूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत अमोल कोल्हे व त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार

37- अहमदनगर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत सुजय विखे पाटील त्यांचा पक्ष आहे भाजप

38- शिर्डी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत सदाशिव लोखंडे त्यांचा पक्ष होता शिवसेना परंतु आता शिंदे गटात

39- बीड लोकसभा मतदारसंघ या ठिकाणाच्या खासदार आहेत डॉ. प्रीतम मुंडे व त्यांचा पक्ष आहे भाजप

40- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर व ते सध्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात

41- लातूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत सुधाकरराव श्रगारे व त्यांचा पक्ष आहे भाजप

42- सोलापूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत जय सिद्धेश्वर स्वामी व पक्ष आहे भाजप

43- माढा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत रणजीत सिंह नाईक निंबाळकर व पक्ष आहे भाजप

44- सांगली लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहे संजय काका पाटील व पक्ष आहे भाजप

45- सातारा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत श्रीनिवास पाटील व ते सध्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार

46- रत्नागिरीसिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत विनायक राऊत व ते सध्या आहेत ठाकरे गटात

47- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचे खासदार आहेत संजय मंडलिक व ते सध्या आहेत शिंदे गटात

48- हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठिकाणचे खासदार आहेत धैर्यशील माने व ते सध्या आहेत शिंदे गटात