Summer Honeymoon Destinations In India : उन्हाळ्यात हनिमूनसाठी ही आहेत ५ सर्वोत्तम पर्यटन स्थळे, जोडीदारासोबत सहल होईल रोमँटिक

Ahmednagarlive24 office
Published:

Summer Honeymoon Destinations In India : नवविवाहित जोडप्यांना लग्नानंतरचे काही क्षण एखाद्या खास ठिकाणी घालवायचे असतात. त्यामुळे नवविवाहित जोडपे सर्वोत्तम पर्यटन स्थळांच्या शोधात असतात. कारण त्यांना त्याचा हा सोनेरी क्षण आनंदात घालवायचा असतो.

त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हनिमूनसाठी जात असाल तर पर्यटन स्थळे निवडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही उन्हाळ्यात थंड हवेची ठिकाणे निवडली नाहीत तर तुम्हाला उष्णतेचे त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही खालील पर्यटन स्थळांना भेट देऊन रोमँटिक क्षण जोदीरासोबत घालवू शकता.

मनाली

तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत हनिमूनसाठी जायचे आहे तर उन्हाळ्यात तुमच्यासाठी मनाली हे एक खास पर्यटन स्थळ ठरू शकते. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात वसलेले मनाली शहर हे हनिमूनसाठी प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

रोहतांग पास, सोलांग व्हॅली, जुनी मनाली, भृगु तलाव, हिडिंबा मंदिर, मणिकर्ण आणि जोगिनी फॉल्स इत्यादी ठिकाणे थाळीमध्ये प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी तुम्ही जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवू शकता. तसेच हायकिंग, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, कॅम्पिंग, रॉक क्लाइंबिंग यासारख्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.

गुलमर्ग

भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणून जम्मू-काश्मीरला ओळखले जाते. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग या पर्यटन स्थळाला देखील तुम्ही जोडीदारासोबत भेट देऊ शकता. भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी गुलमर्गला ओळखले जाते. जोडीदारासोबत तुम्ही या ठिकाणी हनिमूनसाठी जाऊ शकता. या ठिकाणच्या अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊन तुम्ही सहलीचा आनंद घेऊ शकता.

अंदमान निकोबार

अंदमान निकोबार हे एक सर्वात रोमँटिक पर्यटन स्थळ मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो जोडपी हनिमूनसाठी येत असतात. येथील समुद्रकिनारे, पांढरी वाळू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, रिसॉर्ट्स आणि प्रेक्षणीय पाण्याची ठिकाणे खरोखरच सर्वांना आनंद देतात. हॅवलॉक आयलंड, एलिफंटा बीच, नील आयलंड, सेल्युलर जेल, राधानगर बीच, दिगलीपूर, रॉस आयलंड, वायपर आयलंड इत्यादी ठिकाणी तुम्ही एकत्र चांगला वेळ घालवू शकता.

गोवा

गोवा हे एक भारतातील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा असलेले पर्यटन ठिकाण आहे. या ठिकाणी देखील दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. जोडीदारासोबत हनिमूनसाठी हे एक चांगले पर्यटन स्थळ मानले जाते. या ठिकाणी तुम्ही जोडीदारासोबत बीचवर चांगला वेळ घालवू शकता.

औली

लग्नानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवण्यासाठी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित औली या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही नंदा देवी, गुरसो बुग्याल, त्रिशूल शिखर, चिनाब सरोवर, जोशी मठ, रुद्रप्रयाग, नंदप्रयाग, छत्र कुंडला भेट देऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe