दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्याच्या ‘या’ विभागात निघाली 512 रिक्त पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th Pass Government Job : जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. कारण कि, महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागात काही रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या पदासाठी सातवी पास ते दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. यामुळे जर तुमचे शिक्षण कमी असेल आणि तुम्हाला सरकारी नोकरीची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच राहणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 रिक्त पदांसाठी भरती आयोजित झाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केली आहे.

यामुळे आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या भरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला, प्रवाशांच्या मागणीला यश

कोणत्या पदासाठी होणार भरती?

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क), चपराशी (गट ड) या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

वर नमूद केलेल्या पदाच्या एकूण 512 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

वर नमूद केलेल्या पदासाठी पदानुसार सातवी पास ते दहावी पास पर्यंतचे उमेदवार पात्र राहणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्यां उमेदवारांनी मात्र मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असेही जरुरीचे आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता सिबिल स्कोर कमी असला तरी लोन मिळणार; Cibil च्या कारणावरून कर्ज नाकारता येणार नाही, ‘या’ हायकोर्टाने दिलेत आदेश

किती पगार मिळणार

राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, लघुलेखक (निम्नश्रेणी) या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 – 1,32,300 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.

लघुटंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना वेतन दिलं जाणार आहे.

जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना वेतन दिल जाणार आहे.

तसेच चपराशी (गट ड) या पदासाठी या भरतीच्या माध्यमातून जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यांना 15,000 – 47,600 रुपये प्रतिमहिना इतक वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://stateexcise.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज विहित कालावधीच्या आत सादर करू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज 16 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन सादर करता येणार आहे. विहित कालावधीमध्ये सादर झालेल्या अर्जावरच विचार होणार आहे याची नोंद मात्र उमेदवारांनी घ्यायची आहे.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 10वी चा निकाल, कुठ पाहणार रिजल्ट?

अहमदनगरच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा