RBI Bharti 2023 : RBI मध्ये असिस्टंट पदांसाठी भरती सुरु; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Bharti 2023 : जर तुम्ही सध्या बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत सध्या “सहाय्यक” पदांच्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत सहाय्यक पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

येथे एकूण 450 जागांवर भरती केली जाणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदानुसार शैक्षणिक आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

वरील भरती मुंबई येथे होत आहे.

वयोमर्यादा

वरील भरतीसाठी 20 ते 28 वर्षे पर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

जनरल/ OBC/ EWS उमेदवार – 450/- रुपये SC/ST/PwD उमेदवारांसाठी 50/- रुपये इतके शुल्क आहेत.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.rbi.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-उमेदवार https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करू शकतात.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे थेट सादर करायचे आहेत.
-अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.