Recruitment News: सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! मिळेल 1 लाखापेक्षा जास्त पगार, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Recruitment News:- सध्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठीच्या अधिसूचना देखील सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारचा विचार केला तर सध्या विविध जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेतच.

परंतु मागील काही दिवसांअगोदर झालेल्या वनविभाग आणि तलाठी परीक्षेचे निकाल देखील आता लवकरच लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्यांमध्ये शिक्षक भरती देखील आता काही दिवसात राबवण्यात येणार आहे व आता जलसंपदा विभागाची देखील परीक्षा आहे.

एकंदरीत यावरून आपल्याला दिसून येते की बऱ्याच दिवसापासून बंद असलेल्या भरती प्रक्रियांना आता वेग देण्यात येत आहे. त्यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

याचा अनुषंगाने इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबी या विभागांतर्गत देखील सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या लेखामध्ये आपण या भरतीप्रक्रिया विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत.

 इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती

इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबी या विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून यासंबंधी असलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे 23 डिसेंबर 2023 पासून या भरती प्रक्रिया साठी आवश्यक अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमधून सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकाऱ्यांची एकूण 226 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

 काय आहे शैक्षणिक पात्रता?

त्यामध्ये प्रामुख्याने एकूण रिक्त पदे 226 असून यातील 147 पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन शाखेमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे तर उरलेल्या 79 पदे हे संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान शाखेमधून भरली जाणार आहेत.

 किती आहे वयोमर्यादा?

इंटेलिजन्स ब्युरोमधील सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली असून किमान 18 ते कमाल 42 वय असणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.

 अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख?

या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार असून या भरती प्रक्रियाकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 जानेवारी 2024 आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रिया करता कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाहीये.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?

मिळालेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना एक लाख 42 हजार रुपये पगार मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.