जय हो ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की अतिवृष्टी दुष्काळ यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळत असतो.

दरम्यान, आता अशाच अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मदतीबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई मध्ये मोठी वाढ झाली असून आता जवळपास दुपटीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच त्यामुळे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आधी ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर भेटत होते मात्र आता १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत मायबाप शासनाकडून देण्यात येणार आहे. तसेच बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर एवढी रक्कम आत्तापर्यंत मिळत होती त्यामध्ये आता मोठी वाढ झाली असून २७ हजार प्रतिहेक्टर एवढी मदत देण्यात येणार आहे.

याशिवाय बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८ हजार प्रती हेक्टर इतकी मदत शेतकऱ्यांना दिली जात होती पण आता ३६ हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत. साहजिकच अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या मदतीमध्ये शासनाने दुपटीने वाढ केली असल्याने याचा अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत राज्याच्या महसूल आणि वनविभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी बांधवांना बेजार करून सोडले. जून ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला.

त्यावेळी शासनाने अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यावर्षी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना 5439 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होत आहे.