Business Idea: भावांनो नोकरीपेक्षा अधिक पैसा कमवायचा ना…! 20 हजार रुपये क्विंटल विकल्या जाणाऱ्या ‘या’ नगदी पिकाची शेती करा, लाखोंची कमाई होणारं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea: सध्या शेतीमध्ये (Agriculture) नवयुवक तरुणांचा समावेश वाढत आहे. नवयुवक तरुण शेती व्यवसायात (Farming) आपल्या ज्ञानाचा वापर करत मोठा बदल करत आहेत. खरं पाहता पूर्वी शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक पद्धतीने शेती करत होता. मात्र आता यामध्ये मोठा बदल झाला असून नवयुवक तरुण आधुनिक पद्धतीने (Modern Farming) शेती करत आहेत.

नवयुवक तरुण आता काळाच्या ओघात पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांची (Cash crops) शेती करत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer income) होत आहे. मित्रांनो नगदी पिकामध्ये औषधी वनस्पतींचा (Medicinal crops) देखील समावेश होतो.

कलोंजी (Kalonji crop) हे देखील एक प्रमुख औषधी वनस्पती तसेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या वनस्पतीची शेती (Kalonji Farming) आपल्या देशात आता मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला पैसा शिल्लक राहत आहे. अशा परिस्थितीत आज आपण कलोंजी पिकाच्या लागवडी विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कलोंजीचा वापर कुठे केला जातो बरं…!

मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, कलोंजी पासून कलोंजी तेल बनवले जाते आणि या तेलापासून अनेक औषधे बनवली जातात. कलोंजीच्या बिया कधीकधी सुगंधासाठीही वापरल्या जातात. टक्कल पडलेले असल्यास कलोंजी तेल उपयुक्त ठरत असल्याचा जाणकारांचा दावा आहे.

याशिवाय पक्षाघात, मायग्रेन, खोकला, ताप आणि फेशियल पाल्सी यांवरही कलौंजीचे सेवन फायदेशीर ठरते. दुधासोबत कलोंजी खाल्ल्याने काविळवर आराम पडत असतो. खरं पाहता मसाल्यांच्या स्वरूपात कलोंजी प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत या पिकाला बाजारात बारामाही मागणी असते. यामुळे या पिकाची शेती शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देते.

कलोंजीची शेती कशी केली जाते बरं…!

कलोंजीची शेती रब्बी हंगामात केली जाते. हे रब्बीचे पीक असल्याने ज्या शेतकरी बांधवांना या पिकाची शेती करायची असेल ते रब्बी हंगामात या पिकाची लागवड करू शकतात. उत्तर भारतातील मिश्र हिवाळा-उन्हाळा काळ कलोनजीच्या लागवडीसाठी अनुकूल असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.

म्हणूनच कलोंजीची लागवड मुख्यतः उत्तर आणि वायव्य भारतात पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल ते आसामपर्यंत केली जाते. कलोंजीचे रोप झाडीदार आणि एक ते दोन फूट उंच असते. याच्या गोलाकार फळात काळ्या रंगाचे त्रिकोणी आणि 5 ते 7 पेशी बियांनी भरलेल्या असतात. या बियांना कलोंजी म्हणतात.

बाजारात कलोंजी विकणे सोपे आहे

जाणकार लोकांच्या मते, कलोंजी बाजारात सहज विकता येते. चांगला बाजारभाव मिळत असल्याने कलोंजीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कलोंजीच्या अशा अनेक सुधारित जाती आहेत, ज्यांची लागवड केल्यास रोगापासून संरक्षण करतात आणि शेतकऱ्यांना अधिक लाभ देतात. बाजारात कलोंजीला 20 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सामान्य भाव मिळतो. कलोंजीची मागणी इतकी जास्त आहे की अनेक मसाल्यांचे उत्पादन करणारे ब्रँड शेतकऱ्यांकडून कंत्राटी शेतीच्या माध्यमातून कलोंजी विकत घेतात.

कलोंजी लागवडीसाठी उपयुक्त हवामान नेमकं कस असाव बरं…!

सुपारी आणि मसाले विकास संचालनालय, कालिकतच्या मते, भारतातील ज्या भागात रब्बी पिके घेतली जातात तेथे कलोंजीची लागवड केली जाऊ शकते. मध्य ऑक्टोबर ते मध्य नोव्हेंबर हा काळ कलोंजी पेरणीसाठी उत्तम काळ आहे. कलोंजी बियाणे उगवणाच्या वेळी सामान्य तापमानाची आवश्यकता असते, परंतु पिकाच्या पिकण्याच्या वेळी हिवाळा 18 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आणि उन्हाळा 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणे योग्य आहे.

कलोंजीच्या लागवडीसाठी, सेंद्रिय पदार्थांनी युक्त चिकणमाती किंवा वालुकामय चिकणमाती माती सर्वात योग्य आहे. त्याचे pH मूल्य 5 ते 8 दरम्यान असावे. खडकाळ जमिनीत कलोंजीचे उत्पादन चांगले येत नाही. कलोंजीच्या शेतात पाण्याचा निचरा चांगला असावा, कारण त्याला फक्त सामान्य सिंचनाची गरज आहे.

कलोंजीची हार्वेस्टिंग कशी करतात बरं…!

जेव्हा कलोंजीची पाने पिवळी पडू लागतात तेव्हा झाडे मुळासकट उपटून टाकावीत आणि काही दिवस शेतात सुकविण्यासाठी सोडावीत. झाडे पूर्णपणे सुकल्यानंतर, कलोंजीला लाकडाने किंवा यंत्राने ठोकावे आणि कलोंजीची काढणी करावी. एवढं केल्यास कलोंजी पोत्यात भरून बाजारात विकता येणार आहे.