Business Idea: शेतकरी पुत्रांनो शेतीत करिअर घडवायचं ना! मग या पिकाची शेती करा, लाखों नव्हे करोडो कमवा; कसं ते वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत (Farming) बदल घडवून आणला जात आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmer) पीकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत असतात. मित्रांनो भारतात अशी अनेक झाडे आहेत ज्याची लागवड (Tree Farming) करून शेतकरी बांधव चांगला बक्कळ पैसा (Farmer Income) कमवू शकतात. महोगणीचे झाड (Mahogany Tree) देखील अशा झाडांपैकी एक आहे. या झाडाच्या शेतीत (Mahogany Farming) एकदा गुंतवणूक करून शेतकरी बांधव वर्षानुवर्षे उत्पन्न कमवू शकतात.

या झाडांना पूर्णपणे विकसित होण्यासाठी मात्र काही वर्ष शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते. मात्र जर एकदा हे झाड पूर्णपणे विकसित झाले तर शेतकऱ्याना चांगले उत्पन्न मिळू लागते. जानकार लोकांच्या मते या झाडापासून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी चार-पाच वर्षे लागतात. महोगनी झाडांना परिपक्व झाडाचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी सुमारे 6 वर्षे लागतात.  मात्र परिपक्वतेपर्यंत, महोगनी रोपांमुळे शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत नाही, परंतु डाळींच्या झाडांसाठी नैसर्गिक खताचा सर्वात मौल्यवान स्त्रोत असलेल्या ‘नायट्रोजन’चा योग्य प्रमाणात पुरवठा यामुळे होत असतो.

महोगणी झाडासाठी आवश्यक हवामान आणि शेत जमीन

महोगनीच्या झाडाची उंची 40 ते 200 फूट असू शकते. पण भारतात याची सरासरी उंची 60 फूट आहे. त्याची मुळे फार खोलवर जात नाहीत. म्हणूनच ते थोडे नाजूक समजली जातात आणि जास्त वारे असलेल्या भागात याची लागवड करू नये असा सल्ला दिला जातो. पाणलोट जमीन वगळता कोणत्याही सुपीक जमिनीत महोगनीचे झाड लागवड करता येते.

महोगनी हे डोंगराळ आणि मुसळधार पावसाचे क्षेत्र वगळता कोणत्याही हवामानात घेतले जाऊ शकते. त्यांच्या बियांच्या उगवण आणि विकासासाठी सामान्य तापमान योग्य आहे. सुरुवातीच्या काळात महोगनी वनस्पतींना अति उष्णता आणि थंडीपासून संरक्षण करावे लागते. परंतु विकसित झाडे हिवाळ्यात 15 डिग्री सेल्सिअस आणि उन्हाळ्यात 35 डिग्री सेल्सिअस तापमानात चांगली वाढतात.

महोगनी लागवड प्रक्रिया

महोगनी रोपे लावण्यासाठी जून-जुलै हा सर्वोत्तम काळ आहे.  यानंतर पावसाळ्यात झाडांच्या वाढीसाठी पोषक वातावरण होते. यासाठी खोल नांगरणी करावी लागते, त्यानंतर तीन ते चार मीटर अंतरावर तीन फूट रुंदीच्या दोन फूट खोल खड्ड्यांच्या रांगा करून झाडे लावावीत. खड्डे सेंद्रिय व रासायनिक खते मिसळून मातीने भरून हलके पाणी द्यावे. उन्हाळ्यात 5 ते 7 दिवस आणि हिवाळ्यात 10 ते 15 दिवसांनी झाडांना पाणी द्यावे. वाढत्या झाडांची पाण्याची गरज कमी होते. विकसित झाडांसाठी वर्षभरात 5 ते 6 सिंचन पुरेसे आहे. गरजेनुसार खुरपणी आणि निंदणी करत रहा.

महोगनी लागवडीसाठी किती खर्च येतो?

एका एकरात 1200 ते 1500 महोगनी झाडे लावता येतात.  त्याच्या रोपाची किंमत 25-30 रुपये ते 100-200 रुपये आहे. प्रत्यारोपणासाठी वापरल्या जाणार्‍या रोपाचे वय आणि ते कसे विकसित झाले यावर त्याची किंमत अवलंबून असते.  याशिवाय खते, मजुरी आणि इतर खर्च जोडून पाहिल्यास एकरी सरासरी दीड ते अडीच लाख रुपये खर्च येतो.