Business Idea: कोण म्हणत शेती परवडतं नाही? या झाडांची लागवड करा, लाखों नाही करोडो कमवा; कसं ते वाचा इथं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) अनेक अमुलाग्र बदल पाहायला मिळत आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात पिकं पद्धतीत मोठा बदल करत आहेत. शेतकरी बांधव आता बाजारात मागणी असलेल्या पिकांची तसेच झाडांची लागवड (Tree Farming) करत आहेत.

कृषी तज्ज्ञांच्या मते नगदी पिकांची (Cash Crop) शेती ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काही झाडांची लागवड देखील अतिशय फायदेशीर ठरू शकते. बाजारात काही झाडांच्या लाकडाला खूपच अधिक मागणी असते आणि मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने त्यांना बाजारात चांगला भाव देखील मिळतो. कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी झाडाची लागवड केल्यास त्यांना काही वर्षातच या झाडांपासून चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळते.

शिवाय याच्या लागवडीमुळे पर्यावरणाचे देखील संवर्धन होत असते. झाडाची लागवड केल्यास हवामानातील बदलास कमी केले जाऊ शकते. कृषी तज्ञांच्या मते, काही झाडांची लागवड शेतकरी बांधवांनी बांधावरदेखील केली तरीसुद्धा ते कोट्याधीश बनू शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी अशा काही झाडांची माहिती घेऊन हजर झालो आहोत ज्याची लागवड करून शेतकरी बांधव करोडो रुपयांची कमाई करू शकणार आहेत.

मित्रांनो आज आम्ही ज्या झाडांची माहिती देणार आहोत त्यामध्ये चंदन, सागवान, आणि निलगिरी या झाडांचा समावेश आहे. मित्रांनो या तीन झाडांपैकी कोणत्याही एका झाडाची शेतकरी बांधव लागवड करून चांगली कमाई करू शकणार आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या विषयी काही महत्त्वाच्या बाबी.

चंदनाची शेती (Sandalwood Farming):- मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे चंदनाच्या झाडाच्या लाकडाला बाजारपेठेत मोठी मागणी असते. याच्या लाकडाला सर्वाधिक बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी याची लागवड फायदेशीर ठरू शकते. चंदनाचे लाकूड खूपच सुगंधी असते.

यामुळे या लाकडाचा उपयोग कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक केला जातो. यापासून औषधे, परफ्यूम, साबण, सौंदर्य प्रसाधने, तेल अशा अनेक उपयुक्त गोष्टी बनवल्या जातात. यामुळे या लाकडाला बाजारात बारामही मागणी असते. जाणकार लोक सांगतात की, सुमारे एक किलो चंदनाचे लाकूड बाजारात 27 हजार रुपये दराने विकले जाते. चंदनाच्या एका झाडापासून 17 ते 18 किलो लाकूड तयार होऊ शकते. म्हणजे चंदनाचे एकच झाड शेतकरी बांधवांना पाच लाखांची कमाई करून देणार आहे.

सागवान शेती:- चंदनाचे लाकूड पद्धतीने कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मागणी मध्ये असते अगदी त्याच पद्धतीने सागवानाचे लाकूड फर्निचर इंडस्ट्रीमध्ये कायमच डिमांडिंग असते. या लाकडापासून फर्निचर बनवले जातात. जाणकार लोक सांगतात की, पावसाळ्यात शेतातील बांधावर सागवानाच्या झाडाचे रोपण करू शकता, जेणेकरून काही वर्षांनी झाड परिपक्व झाल्यावर चांगले उत्पन्न मिळू शकेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की सागवान सर्व प्रकारचे हवामान सहन करते. एवढी कमी जोखीम असलेल्या झाडाची शाश्वत लागवड केल्यास कमी खर्चात दुप्पट नफा मिळवता येतो. त्याचे लाकूड बाजारात खूप महाग विकले जाते. रिपोर्ट्सनुसार, 12 वर्षे जुन्या झाडाची किंमत 25 ते 30 हजार रुपये असते. अर्थातच याच्या झाडाची व्यावसायिक शेती शेतकऱ्यांना लखपती बनवणार आहे.

निलगिरीची शेती:- निलगिरीच्या झाडाला भारतीय शेतकऱ्यांची पहिली पसंती असते याचे प्रमुख कारण म्हणजे हे झाड कमी पाण्यातही झपाट्याने वाढते आणि हवामानाचा रागही सहज सहन करते. या झाडाच्या लाकडाला बाजारपेठेत मोठी मागणी असते. याचे लाकूड फर्निचर, इंधन आणि कागदाची माच बनवण्यासाठी वापरले जाते.

जाणकार लोकांच्या मते, याचे झाड परिपक्व होण्यासाठी सुमारे 8 ते 10 वर्षे लागतात. त्याच्या झाडाचा डिंक आणि पानांपासून काढलेले औषधी तेल अनेक रोगांपासून मुक्त होण्यासाठी वापरले जाते. यामुळे या झाडाची फर्निचर तसेच औषधी बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी मागणी असते.