Cow Rearing: तुमच्याही गोठ्यातील गाय माजावर आली आहे का? या 3 गोष्टींची घ्या काळजी होईल फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cow Rearing:- पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने दुधाचे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून शेतकरी गाय व म्हशीचे व्यवस्थापन करत असतात. गाय किंवा म्हशी पासून चांगले दुधाचे उत्पादन मिळावे याकरिता त्यांचे चाऱ्याचे व्यवस्थापन तर महत्वाचे असतेस

परंतु त्या दृष्टिकोनातून आरोग्य व्यवस्थापनावर देखील काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे असते. तसेच वाढीव दूध उत्पादन मिळवण्यासाठी गाय असो किंवा म्हैस यांचा प्रजनन काळ हा खूप महत्त्वाचा असतो व त्या अनुषंगाने नियोजन करणे खूप गरजेचे असते.

कारण प्रजनन कालावधी किंवा प्रजननाशी संबंधित जर काही तक्रारी असतील तर मात्र पशुपालक शेतकऱ्यांना फायदा ऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. या मध्ये जर आपण गाईंच्या बाबतीत विचार केला तर बऱ्याचदा प्रत्येक वेताला नराची पैदास होने किंवा अनेकदा गाईला भरून देखील गाभण न राहणे, व्यवस्थित चारा वगैरे खाऊन देखील गाय निरोगी न दिसणे यासारख्या अनेक समस्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना येत असतात.

तसेच बऱ्याचदा वातावरणात थोडाफार बदल झाला किंवा चाऱ्यामध्ये बदल झाला तरी दहा ते पंधरा लिटर दूध देणारी गाय आठ ते दहा लिटर दूध द्यायला लागते. या व अशा अनेक प्रकारच्या  समस्यांमुळे पशुपालक शेतकरी त्रस्त असल्याचे सध्या चित्र आहे. या तुलनेमध्ये जर कमीत कमी गाईंपासून जर जास्त दूध मिळवले तर दुधाला कमी दर असताना देखील शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. याकरिता जर काही महत्त्वाच्या बाबी जर शेतकऱ्यांनी पाडल्या तर नक्कीच फायदा होऊ शकतो.

 या गोष्टींची काळजी शेतकऱ्यांना देऊ शकते आर्थिक फायदा

1- सेक्स सॉर्टेड सिमेन बाजारामध्ये विविध लिंग वर्गीकृत वीर्यकांड्या उपलब्ध असतात. या काड्यांचा वापर केल्यामुळे गाईला 95 टक्के कालवड होण्याची शक्यता असते. या कालवडीचा जन्म झाल्यानंतर पुढच्या एक वर्षांमध्ये ही गाय बनते व दूध द्यायला सक्षम होते.

एवढेच नाही तर या माध्यमातून तयार होणारी कालवड ही इतर गाईंच्या तुलनेमध्ये जास्त दूध देणारी असते. त्यामुळे चांगल्या दूध देणाऱ्या नवनवीन गाई खरेदी करताना जो काही त्रास होतो तो थांबतो.

तसेच या तंत्रज्ञानाच्या साह्याने जन्माला आलेली कालवडी ब्रूसोलिसिस यासारख्या समस्यांना प्रतिकारक असल्यामुळे  या पद्धतींच्या कालवडींचे योग्य संगोपन केल्यास शेतकऱ्यांना कमीत कमी कालावधी मध्ये जास्त दूध उत्पादन मिळते.

2- रेतन नोंदी रेतन काळ कृत्रिम रेतन करायचे असेल तर ते शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करणे गरजेचे असते. तसेच रेतन करतांना वापरलेली वीर्यकांडीची माहिती टिपून ठेवावी व सोबत रेतन कोणत्या तारखेला केले ते देखील नोंद ठेवावी. ज्यामुळे रेतनानंतर 75 दिवसांनी गाय गाभण आहे की नाही याची पशुवैद्यकीय सहाय्यक यांच्याकडून व्यवस्थित रित्या खात्री करता येऊ शकते.

3- जतांचे निर्मूलन सकस आहार गाईला दर तीन महिन्यांनी व कालवडीला दर महिन्याला जंतनाशक देणे खूप गरजेचे असते. असे केल्याने गाय किंवा कालवडीच्या शरीरामध्ये असलेल्या जंतांचा नायनाट होतो  त्यामुळे गाय व कालवड यांची प्रकृती उत्तम राहते. तसे जंतनाशक देताना मात्र प्रत्येक महिन्याला वेगवेगळे घटक असलेले जंतनाशक देणे गरजेचे आहे.

त्यामुळे गायीच्या आणि कालवडीच्या शरीराला ठराविक अशा एका घटकाची सवय लागत नाही. तसेच दुधाळ जनावरांना दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारचा चारा देणे गरजेचे आहे. यामुळे दुधाळ जनावरे अधिकाधिक दूध देऊ शकतात. तसेच गाई व वासरांना नियमितपणे सकस आहार व जंतनाशक असेल तर ते वेळोवेळी माज दाखवतात व त्यातून त्यांचा भाकड काळ कमी होतो.

अशा पद्धतीने माजाच्या कालावधीमध्ये जर या तीन गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.