Milk Increase Tips: उन्हाळ्यात ‘या’ उपायोजना करा आणि दूध उत्पादन वाढवा! मिळेल पैसाच पैसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milk Increase Tips:- उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांनी जनावरांची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण वाढत्या उष्णतेचा विपरीत परिणाम हा जनावरांच्या आरोग्यावर होतो व दूध उत्पादन कमी होण्यावर देखील होतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच काही उपाययोजना करून दूध उत्पादनात सातत्य ठेवणे खूप गरजेचे असते.

उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई, जनावरांच्या आहारामध्ये झालेला बदल व उष्णता यामुळे जनावरांच्या रवंथ करण्याच्या प्रक्रियेवर देखील परिणाम होतो व जनावरांना अपचनासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे साहजिकच जनावरे चारा कमी खातात व दूध उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे दूध उत्पादन वाढीसाठी उन्हाळ्यात काय उपाययोजना कराव्यात? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 उन्हाळ्यात दूध उत्पादन वाढीसाठी करा हे उपाय

1- आहाराचे व्यवस्थापन उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये दूध उत्पादन वाढावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर या कालावधीत आहारातील चाऱ्याचे प्रमाण कमीत कमी ठेवून पशुखाद्य किंवा खुराक वाढवावा. यामुळे जनावरांच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याच्या प्रमाणात वाढ होईल.

परंतु असं केल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण देखील घटू शकते. याकरिता उन्हाळ्यामध्ये आहारातील ऊर्जेचे प्रमाण वाढावे याकरिता स्निग्ध पदार्थांचा किंवा बायपासचा फॅटचा वापर करणे गरजेचे आहे. असा बदल जर केला तर एक ते दीड लिटर पर्यंत दूध उत्पादन वाढणे शक्य आहे व जनावरांवर येणारा उष्णतेचा ताण देखील कमी होऊ शकतो.

2- रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये बायपास फॅटचा वापर फायद्याचा जे जनावरे रवंथ करतात अशा जनावरांच्या आहारामध्ये फॅटयुक्त पदार्थांचा जास्त वापर केला गेला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. यामध्ये तंतुमय पदार्थांचे पचन कमी होणे तसेच ओटी पोटातील जीव जंतूंना विषबाधा होणे तसेच पचलेले अन्न शोषायला अडथळा येणे असे विपरीत परिणाम दिसायला लागतात. म्हणून बायपास फॅटचा वापर फायद्याचा ठरतो.

3- जनावरांच्या आहारात फॅटचा वापर किती करावा?- जनावरांच्या आहारामध्ये पाच ते सात टक्क्यांपेक्षा जास्त फॅटचा वापर करू नये. त्यासोबतच जनावरांना 30 ते 40% पेक्षा अधिक आहारातील फॅट तेलबियांमधून देऊ नये. त्याऐवजी 40 ते 45% पर्यंत फॅटची पूर्तता ही धान्य व इतर घटकातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा व त्यासोबतच 15 ते 30 टक्क्यांपर्यंत फॅटची गरज बायपास फॅटच्या माध्यमातून पूर्ण करावी.

4- या कालावधीत हिरव्या आणि कोरड्या चाऱ्याचे नियोजन महत्त्वाचे जनावरांची शारीरिक क्रिया व्यवस्थित व योग्यरित्या चालू राहावी याकरिता जास्त ऊर्जा देणारा आहार दिल्यास त्याचा वापर शरीर वाढीसाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी केला जातो. जनावरांच्या  शरीराला मिळणारी ऊर्जा ही जनावरे कोरडा चारा किती खातात या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत जनावरांनी कोरडा चारा योग्य प्रमाणामध्ये खावा याकरिता त्यांना थोडा थोडा चारा खायला द्यावा.

चारा खाण्याचे प्रमाण जर कमी असेल तर पशुखाद्य, पेंड यांचे प्रमाण वाढवावे. म्हणजेच कमीत कमी चाऱ्यातून देखील जनावरांना शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत राहतात. थंड वेळी जनावरांना चारा खायला द्यावा व तो देताना हिरवा, वाळलेला चारा कुट्टी करून मिसळून खायला द्यावा. या कालावधीत जनावरांच्या आहारामध्ये फक्त वाळलेल्या चाऱ्याचा वापर करू नये.