Farmer Scheme : शेतकऱ्यांनो, सामूहिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; मिळणार 3 लाख 39 हजाराच अनुदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी या अनुषंगाने शेततळे योजना राज्य शासनाकडून राबवली जात आहे. वैयक्तिक शेततळे योजना तसेच सामूहिक शेततळे योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात.

2022-23 साठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राज्यात सामूहिक शेततळे योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत इच्छुक शेतकरी बांधवांनी सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले जात आहे.

दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन उपलब्ध करून देणे परिणामी दुष्काळी भागात फलोत्पादन क्षेत्र वाढेल हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर सामूहिक शेततळे अनुदान योजना राबवली जात आहे.

मात्र असे असले तरी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकरी गटाकडे फळपीक असणे अनिवार्य आहे. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना सामूहिक शेततळे अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकरी बांधवांनी फळ पीक लागवड केलेली असणे ही या योजनेची अट आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सामूहिक शेततळे अनुदासाठी पात्र असलेल्या शेतकरी गटाला तळ्याच्या आकारमानानुसार अनुदान अनुज्ञेय केल जाणार आहे. म्हणजे ३४×३४×४.७० मीटर आकाराच्या सामूहिक शेततळ्यासाठी तीन लाख 39 हजार रुपये अनुदान राहणार आहे.

मात्र यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर ते पाच हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच २४×२४×४ मीटर आकाराच्या सामूहिक शेततळ्यासाठी एक लाख 75 हजार रुपयांचे अनुदान अनुज्ञेय केले जाणार आहे. यासाठी मात्र एक हेक्टर ते दोन हेक्टर फलोत्पादन क्षेत्र असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या लाभ घेऊ इच्छ‍िणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन देखील अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. जी. डाबरे यांनी देखील या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सामूहिक शेततळे अनुदान प्राप्तीसाठी शेतकरी बांधवांना mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावे लागणार आहेत. अनुदानाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.