मनसे भले शाब्बास…! शेतकऱ्यांसाठी राज साहेबांची ‘मनसे’ कामगिरी, ‘या’ शेतकऱ्यांना देणार खत, खाद्य, बी-बियाणं अन….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme: राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. मात्र तत्पूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात (Yavatmal) विशेषत विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते.

विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस (Heavy Rain) झाल्याने शेतकरी बांधवांचे (Farmer) प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसारख्या पावसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळाली यामुळे पेरणी केलेली पिके सर्वस्वी पाण्याखाली गेली आणि परिणामी शेतकरी बांधवांवर आता दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे.

पहिल्यांदा पेरणी करताना राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठा आटापिटा करून पैशांची उभारणी केली आणि खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची मोठ्या आशेने पेरणी केली. आता राज्यातील अनेक जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले असल्याने शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करण्यासाठी एवढा मोठा पैसा उभा कसा करायचा याची मोठी चिंता लागून आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात एकच आमदार असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मनसेने (MNS) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाने एक कौतुकास्पद योजना सुरु केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मनसेने “राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना” सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितचं दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या बळीराजाला या योजनेचा मोठा आधार होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

“राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना” नेमकी आहे तरी काय :- मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी बँकेकडून कर्ज घेऊन खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. मात्र विदर्भात सुरुवातीला खूपच कमी पाऊस होता त्यामुळे शेतकरी बांधवांना दुबार पेरणी त्या वेळी करावी लागली होती.

त्यानंतर जेमतेम पैशाची उभारणी करून शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात दुबार पेरणी केली. मात्र, विदर्भात विशेषता यवतमाळ जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पावसाचे अक्षरश थैमान बघायला मिळाले. जिह्यातील वणी, मारेगाव आणि झरीजामनी या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आणि परिणामी या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांची दुबार पेरणी केलेली पिके सुद्धा पाण्याखाली गेली. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून यवतमाळ जिल्ह्यातील मनसेने राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळवून देणे हा आहे.

रब्बी हंगामात तरी जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना मदतीचा हात लावावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या तीन तालुक्‍यांतील सुमारे सहाशे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात या योजनेच्या माध्यमातून खत,खाद्य, बी-बियाणे यांची मनसेकडून मदत केली जाणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मनसे शेतकऱ्यांना घरपोच हे सारे साहित्य पोहचवणार आहे. निश्चितच पावसामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे.