Farmer Success Story: तरुणाने माळरानावर फुलवली स्ट्रॉबेरीची बाग! मिळत आहे 350 रुपये प्रतिकिलो दर, वाचा कसे केले व्यवस्थापन?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- तरुणाई म्हटले म्हणजे कायम नाविन्यतेचा ध्यास व काहीतरी नवीन निर्मिती करण्यासाठी वाटेल ते करण्याची जिद्द होय. कुठल्याही क्षेत्रांमध्ये तरुणाई अनेक नवनवीन गोष्टी करत असतात व या नवनवीन प्रयोगातून बऱ्याच गोष्टी यशस्वी देखील करतात.

अगदी त्याच पद्धतीने कृषी क्षेत्रामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर तरुण शेतकरी येऊ लागले असल्याने परंपरागत पीक पद्धती व शेती पद्धतीला रामराम ठोकत या तरुणाईने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात करायला सुरुवात केली असल्याकारणाने वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यामध्ये हातखंडा मिळवला आहे.

मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे तरुणाईचा कल आपल्याला दिसून येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण शेतकरी यशस्वी होताना देखील आपल्याला दिसून येत आहेत.

याच पद्धतीने जर आपण कवठेमहांकाळ तालुक्यात असलेल्या कुची या गावचे आकाश ढेरे या 33 वर्षाच्या शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्यांनी अक्षरशः माळरानावर स्ट्रॉबेरीची लागवड केली व अपार मेहनतीने यशस्वी देखील करून दाखवली. हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे परिसरात देखील त्याची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

 आकाश ढेरे यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली यशस्वी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची या गावचे आकाश अशोक ढेरे या 33 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने माळरानावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी केली असून या माध्यमातून त्यांनी चांगले आर्थिक उत्पन्न मिळवायला देखील सुरुवात केलेली आहे.

जर आपण आकाश यांच्या कुटुंबीयांचा विचार केला तर ते शेतीमध्ये प्रामुख्याने द्राक्ष, पेरू आणि ऊस या पिकांची लागवड करायची व  कष्ट तसेच खर्चाच्या मानाने यापासून त्यांना अपेक्षित आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे शेतीमध्ये काहीतरी वेगळे करावी

अशी इच्छा सगळ्यांच्या मनात असतानाच त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा विचार केला व त्या पद्धतीने तयारी देखील करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी ऑक्टोबर मध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली व तीन गुंठे जमिनीवर प्रयोग म्हणून स्ट्रॉबेरी लागवड अगोदर केली.

या तीन गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरी चे जवळपास 1000 रोपांची लागवड करता आली व सध्या या स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळायला लागले असून बाजारपेठेमध्ये त्या स्ट्रॉबेरीला साडेतीनशे रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे व त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 या गुणधर्मामुळे स्ट्रॉबेरीला असते चांगली मागणी

स्ट्रॉबेरीमध्ये पॉलिफिनॉल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे शरीरात असलेल्या अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास ती प्रभावी ठरते. स्ट्रॉबेरी मध्ये असलेले विटामिन सी वजन कमी करण्यासाठी व कर्करोगापासून बचाव करण्यास मदत होते व स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

म्हणजेच एकंदरीत जर पाहिले तर आरोग्यदायी गुणधर्म असल्यामुळे स्ट्रॉबेरीला बाजारपेठेत चांगली मागणी असते. विशेष म्हणजे ॲमेझॉन सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असल्याने त्या ठिकाणी तिची विक्री उत्तम होते.