Goat Farming : शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या पाच ॲप्स आहेत खूप खास; जाणुन घ्या याविषयी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Goat rearing :- असं सांगितलं जातं की, शेतीच्या सुरुवातीपासूनच शेतकरी पशुपालन (Animal Husbandry) करत आले आहेत. मात्र अलीकडे पशुपालन व्यवसाय चे व्यापारीकरण झाले असून दुय्यम व्यवसाय म्हणुन ओळखला जाणारा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायाची जागा घेऊ लागला आहे.

पशूपालनात छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेळीपालन (Goat rearing) करतात. हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरत आहे. शेळीचे मांस तसेच शेळीचे दूध विकून शेळी पालन करणारे शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

शेळीपालनातून होत असणारा फायदा बघता गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक तसेच भूमिहीन शेतकरी लोक शेळीपालनाकडे वळले आहेत, जर हा व्यवसाय शास्त्रोक्त पद्धतीने केला तर निश्चितच फायद्याचा ठरू शकतो.

यामुळे शेतकर्‍यांनी सर्वप्रथम शेळीपालनाची शास्त्रोक्त पद्धती जाणून घ्यावी असा सल्ला दिला जातो. परंतु शेतीच्या इतर कमांमुळे शेतकर्‍यांना शेळीपालनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे अनेकदा शेळीपालन व्यवसाय यशस्वी होत नाहीत.

यामुळे आज आपण अशा 5 मोबाईल अँप्स (Mobile App For Goat Farming) जाणुन घेणार आहोत ज्यामुळे शेतकऱ्यांचा मार्ग अधिक सोयीस्कर होणार आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हे सर्व मोबाईल अँप्स ICAR सेंट्रल गोट रिसर्च इन्स्टिट्यूट मखदूम फराह मथुरा या संस्थेने विकसित केले आहेत. हे अँप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण एप्लिकेशन्स विषयी.

बकरीमित्र मोबाईल अँप भारतीय कृषी संशोधन केंद्रीय शेळी संशोधन संस्था (ICAR) आणि आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था नैरोबी केनिया यांनी बकरीमित्र (ICAR-CIRG) मोबाइल अँप विकसित केले आहे. हे मोबाईल अँप उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील शेळीपालकांच्या अनुषंगाने तयार करण्यात आले आहे.

या मोबाईल अँपच्या माध्यमातून शेळीपालनाच्या मुख्य बाबी जसे की जातीचे पोषण, आरोग्य, प्रजनन, विपणन, गृहनिर्माण आणि सामान्य व्यवस्थापन याबाबत माहिती घेतली जाऊ शकते.

एकूणच, हे मोबाईल अँप संस्थेमार्फत चालवले जाणारे विविध प्रशिक्षण आणि कार्यक्रमांची माहिती देते. मोबाईल अँपवर संस्थेचा फोन नंबर देखील आहे, ज्याद्वारे शेळीपालन करणारे शेतकरी थेट संस्थेशी संपर्क साधू शकतात.

गोट ब्रीड अँप ICAR सेंट्रल गोट रिसर्च इन्स्टिट्यूटने गोट ब्रीड मोबाईल अँप देखील विकसित केले आहे. हे मोबाईल अँप्लिकेशन हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. एप्लीकेशन च्या नावावरून आपल्या लक्षात आले असेल की हे ॲप्लिकेशन शेळ्यांच्या जाती सांगण्यासाठी तयार केले गेलं असेल.

हे मोबाईल अँप भारतीय शेळ्यांच्या जातींबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. या मोबाईल अँपचा मुख्य उद्देश शेळीपालनामध्ये सहभागी किंवा स्वारस्य असलेल्या शेतकरी आणि उद्योजकांमध्ये मूलभूत ज्ञानाचा प्रसार करणे हा आहे.

CIRG – Goat Farming अँप्लिकेशन शेळीपालन (CIRG – Goat Farming) मोबाईल अँप देखील केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने विकसित केले आहे. हे मोबाईल अँप हिंदी, तमिळ, कन्नड आणि इंग्रजी भाषेत माहिती प्रदान करते.

या मोबाईल अँपमध्ये भारतीय शेळ्यांच्या जाती, त्यांचे प्रजनन व्यवस्थापन, शेळीच्या वयोगटानुसार त्यांचे पोषण व्यवस्थापन माहिती, चारा उत्पादन, निवारा व्यवस्थापन आणि सामान्य काळजी, आरोग्य व्यवस्थापन आणि शेळीचे मांस आणि दुग्धजन्य पदार्थांची माहिती आहे. एकूणच हे अँप्लिकेशन शेळीपालनाशी संबंधित शेतकऱ्यांना प्राथमिक माहिती पुरवते.

Goat Products गोट प्रोडक्ट्स नावाचे हे मोबाईल अँप देखील केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने विकसित केले आहे. हे मोबाईल अँप हिंदी, तमिळ, कन्नड भाषेत माहिती देते. हे मोबाईल अँप शेळीशी संबंधित उत्पादनांची माहिती देते. ज्यामध्ये शेळीशी संबंधित उत्पादने, शेळीचे मांस आणि दुधापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने आणि त्यांच्या पोषणाची माहिती देण्यात आली आहे.

एआय इन गोट्स मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सेंट्रल गोट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 5 व्या मोबाईल अँप्लिकेशन चे नाव आहे एआय इन गोट्स. हे मोबाईल अँप शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाची माहिती देते. मुळात, हे मोबाईल अँप्लिकेशन शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाच्या तंत्राची सविस्तर माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

याद्वारे शेळीपालक शेळीच्या जनुकीय सुधारणा तसेच जातीच्या संवर्धनासाठी काम करू शकतात. निश्चितच या पाच एप्लीकेशनचा उपयोग करून शेळी पालन करणारे शेतकरी बांधव या व्यवसायातील सर्व बारकावे समजून घेऊ शकतील आणि हा व्यवसाय वाढवण्यास त्यांना यामुळे मदत होणार आहे.