भेंडी पिकापासून कमी वेळेत कमवायचे असतील लाखो रुपये तर ‘या’ जातींची करा लागवड! देतील भरघोस उत्पादन आणि मिळेल पैसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजीपाला पिके ही कमीत कमी वेळेमध्ये आणि तुलनेने इतर पिकांपेक्षा कमी खर्चात खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळवून देतात. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, मिरची,वांगी,भेंडी, इतर वेलवर्गीय भाजीपाला पिके इत्यादींचा यामध्ये समावेश होतो.

परंतु कुठल्याही पिकापासून तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला त्या पिकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे लागते. परंतु यामध्ये देखील तुम्ही कितीही योग्य प्रकारे व्यवस्थापन ठेवले परंतु पिकाचे वाण निवडताना जर चुकीचे निवडले गेले तर काहीही फायदा न होता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

त्यामुळे कुठल्याही पिकाचे वाण निवडताना ते सुधारित व दर्जेदार असणे खूप गरजेचे असते. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये भेंडी या महत्त्वाच्या भाजीपाला पिकाच्या काही सुधारित जातींची माहिती घेणार आहोत.ज्या अधिकचे उत्पादन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

 भेंडी पिकाच्या या सुधारित जाती देतील भरघोस उत्पादन

1- परभणी क्रांती भेंडी या भाजीपाला पिकाची ही जात खूप महत्त्वपूर्ण असून लागवडीनंतर साधारणपणे 50 दिवसांनी काढणीला सुरुवात होते. तसेच परभणी क्रांती या वाणाची भेंडी रंगाने गडद हिरवी असते व 15 ते 18 सेंटीमीटर लांब असते. विशेष म्हणजे भेंडीची ही जात करपा तसेच लिफ कर्ल व हळद्या या रोगांना सहनशील आहे.

2- अर्का अभय भेंडीची ही जात देखील उत्पादनासाठी खूप चांगली असून या जातीची भेंडी साधारणपणे 120 ते 150 सेंटीमीटर उंच आणि अगदी सरळ रेषेत वाढते. अर्का अभय या भेंडीच्या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही येल्लो वन मोझॅक वायरस रोगाला चांगली प्रतिकारक आहे.

3- अर्का अनामिका भेंडीची ही जात पसरट असून तिला अनेक शाखा फुटतात. तसेच अर्का अनामिका जातीच्या भेंडीला लव नसून ती मऊ असते. तिची ही जात येलो मोसेक व्हायरसला प्रतिबंधित आहे. अर्का अनामिका हा भेंडीचा वाण उन्हाळा आणि पावसाळ्यात दोन्ही कालावधीत लागवडीकरिता योग्य आहे.

4- वर्षा उपहार भेंडीचा हा वाण देखील भरघोस उत्पादनासाठी ओळखला जाणारा वाण असून या वाणाचे झाड 90 ते 120 cm पर्यंत उंच वाढते व पानांचा रंग गडद हिरवा असतो. हे पावसाळ्यात लागवडीसाठी योग्य असून पावसाळ्यात 40 दिवसांनी ही फुलोरा अवस्थेत येते. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाण पिवळा मोझॅक विषाणू रोगाला प्रतिरोधक आहे.

5- पुसा सावनी भेंडीचा हा वाण उन्हाळा आणि पावसाळा या कालावधीत लागवडीकरिता उपयुक्त असून या जातीची भेंडी ही गडद हिरव्या रंगाचे असते. पुसा सावनी ही जात देखील पिवळ्या मोझॅक  व्हायरस रोगाला प्रतिबंधित आहे.