Isabgol Farming : काय सांगता! कोरडवाहू भागात देखील इसबगोल लागवड शक्य, महाराष्ट्रात पण लागवड करता येते, इसबगोल लागवडीची शास्त्रीय पद्धत वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Isabgol Farming : इसबगोलची शेती (farming) शेतकऱ्यांना (farmer) कमी वेळेत जास्त उत्पन्न (farmer income) देणारी सिद्ध ठरणार आहे. मित्रांनो खरे पाहाता अलीकडे भारत वर्षात औषधी वनस्पतींच्या (medicinal crop) शेतीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात वळले आहेत.

इसबगोल देखील एक औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती (medicinal plant farming) म्हणून याची लागवड भारतातील गुजरात या राज्यात सर्वाधिक केली जाते. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात या पिकाचे लागवड शक्‍य होणार आहे. महाराष्ट्रातील (maharashtra farmer) खानदेश प्रांत या पिकाच्या लागवडीसाठी सर्वात उत्कृष्ट असल्याचा दावा केला गेला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, इसबगोलचा उपयोग अनेक प्रकारचे आजार दूर करण्यासाठी केला जातो. तसेच यापासून अनेक प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. उदाहरणार्थ, आईस्क्रीम आणि रंग भरण्याच्या वस्तू इ. इसबगोलची झाडे 30 ते 40 सेमी उंचीचे असतात. इसबगोल पिकाच्या लोंब्या गव्हासारखे दिसतात. याच्या झाडाची पाने भाताच्या झाडासारखी असतात.

आपल्या देशात त्याची लागवड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान येथे केली जाते. आता महाराष्ट्रात देखील याची लागवड शक्‍य आहे. इसबगोल हे रब्बी हंगामात उत्पादित केले जाणार पीक आहे.  हे जनावरांसाठी पशुखाद्य म्हणून देखील वापरले जाते. इसबगोल भुसामध्ये स्वतःच्या वजनाच्या कितीतरी पट पाणी शोषून घेण्याची क्षमता असते.

योग्य हवामान आणि माती

उष्ण हवामानात याची लागवड सहज करता येते. जमिनीचे pH मूल्य तिच्या झाडांच्या वाढीसाठी सामान्य असावे. पिकाच्या लागवडीवेळी वातावरण स्वच्छ आणि कोरडे असावे कारण हलक्या पावसानेही पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.

जर आपण जमिनीबद्दल बोललो तर योग्य निचरा होणारी आणि सुपीक जमीन आवश्यक आहे. जर माती ओलसर असेल तर झाडे वाढू शकत नाहीत. वालुकामय चिकणमाती असलेली जमीन त्याच्या लागवडीसाठी योग्य मानली जाते. ज्यामध्ये जीवाश्मांचे प्रमाण जास्त असावे.

शेतीची तयारी

शेतकरी बांधवांना जर इसबगोलची लागवड करायची असेल, तर शेताची चांगली तयारी करणे आवश्यक आहे. यासाठी खरीप पीक काढणीनंतर उभी आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. शेतात दीमक येण्याची समस्या असल्यास फोर्टे शेवटच्या पेरणीच्या वेळी 10 ग्रॅम 20 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात मिसळावे. यानंतर शेतात फळी मारून जमीन समतल करावी. त्यामुळे पाणी तुंबणार नाही.

आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की त्‍याच्‍या बिया शेतात सपाट वाफ्यात आणि उंच गोट घालून किंवा बेड बनवून अशा दोन्ही पद्धतीने पेरल्या जातात. इसबगोलच बियाणं फोकून त्याची पेरणी करता येणे शक्य आहे. बियाणा फोकताना माती मिसळावी जेणेकरून बियाण समप्रमाणात टाकलं जाईल. बियाणं फोकलं की त्यावर माती टाकावी. तसेच टोकण पद्धतीने बियाणं पेरणी करतांना 30 सेंटीमीटर अंतरावर बिद पाडून बियाणे टोकण केल पाहिजे.

इसबगोल बियाण पेरणी कशी करावी

इसबगोलच बियाणं ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत पेरावे. सुमारे 3 ग्रॅम थिरम प्रति किलो या दराने बियाण्याची प्रक्रिया करा आणि बियाणे जमिनीत मिसळा. यानंतर पेरणी करावी.

इसबगोल पिकासाठी सिंचन व्यवस्थापन कसं असावं

इसबगोलची लागवड करताना झाडांना जास्त सिंचनाची गरज नसते. बिया पेरल्यानंतर फक्त हलके पाणी द्यावे. बियांची उगवणक्षमता कमी असल्यास साधारण 4 ते 5 दिवसांनी शेतात हलके पाणी द्यावे. यामुळे बिया व्यवस्थित अंकुरू शकतात. बियाणे उगवल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी पहिले पाणी द्यावे. पहिले पाणी दिल्यानंतर साधारण 20 ते 30 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

इसबगोल पिकाची काढणी कशी केली जाते

जेव्हा लोंब्या लाल होतात आणि हाताने मॅश केल्यानंतर किंवा दाबल्यानंतर दाणे वेगळे होऊ लागतात तेव्हा रोपांची कापणी करावी. त्याचे लोंब्या दर 2 ते 3 दिवसांनी काढणी करावी. लोंब्या तोडून एका जागी ठेवा. झाडे काढण्यासाठी सकाळचा वेळ चांगला असतो, कारण यावेळी बिया फारच कमी प्रमाणात लोंब्यामधून पडतात.

शेतकरी बांधव यंत्राद्वारे देखील त्याचे धान्य काढू शकतात, कारण त्याची भुसी किंवा कोंडा देखील खूप उपयोगाचा आहे. त्याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी होतो. याच धान्य आठ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विकले जाते.

एका हेक्टरमध्ये जवळपास 12 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी इसबगोल बियाणे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना हव असल्यास ते विद्यापीठाशी संपर्क साधू शकणार आहेत.