KCC Scheme: शासनाच्या ‘या’ योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळवा कमीत कमी व्याजदरात कर्ज, वाचा पात्रता, कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गेल्या काही वर्षांपासून विचार केला तर शेतीवर अनेक नैसर्गिक आपत्तींचे संकट सातत्याने येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याचदा हातात आलेले पिके वाया जात असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका(Financial Crisis)देखील बसत आहे. या सगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परंतु काहीही झाले तरी शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या तयारी करिता म्हणजेच बी बियाणे खरेदी, खतांची खरेदी आणि इतर महत्त्वाच्या बाबींसाठी पैसा लागतोच.

त्यामुळे बरेच शेतकरी(Farmer) कर्ज घेण्याचा पर्याय स्वीकारतात. शेतकरी बऱ्याचदा बँकांकडे पीक कर्जासाठी अर्ज करतात. परंतु बँकांकडून वेळेत कर्ज उपलब्ध होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे बरेच शेतकरी खाजगी सावकारांकडे कर्जाची मागणी करतात व एकदा का सावकारांकडून कर्ज घेतले तर या चक्रात शेतकरी पूर्ण अडकतात. या सगळ्या समस्या वर उपाय म्हणून सरकार(Government) ने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले असूनही योजना 1998 पासून मुळात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज मिळते.

 किसान क्रेडिट कार्डचे फायदे

किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असून या कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात तीन लाखांपर्यंतचे कर्ज(Loan) उपलब्ध करून देते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज फक्त चार टक्के व्याजदराने मिळते. याकरिता अर्जदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक असून कमाल वय हे 75 वर्षे असावे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

कार्डच्या माध्यमातून शेतकरी पाच वर्षात तीन ते चार लाख रुपयांपर्यंतची कर्ज मर्यादा मिळू शकतात. घेतलेल्या कर्जाची जर वेळेवर परतफेड केली तर व्याजदरामध्ये खूप सवलत देण्यात येते. एवढंच नाही तर सरकारच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्डवर घेण्यात येणाऱ्या कर्जावर दोन टक्के अनुदान(Subsidy) देण्यात येते व व्याजाची वेळेत परतफेड केल्यास तीन टक्के सूट देखील मिळते.

 किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

तुम्हाला देखील जर किसान क्रेडिट कार्ड करीता अर्ज करायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि जमिनीचे कागदपत्र आवश्यक आहे.

 किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांना जर किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल व त्याकरिता अर्ज करायचा असेल तर शेतकरी कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करू शकतात. याकरिता तुम्हाला जवळच्या बँकेत जाणे गरजेचे असून त्या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड करीता अर्ज करावा. त्यानंतर लागणारी कागदपत्रे जमा करणे गरजेचे असते. यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. एवढेच नाही तर बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड करीत अर्ज करता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड हवे असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत बँकेचे खाते असणे गरजेचे आहे.

 साधारणपणे किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची पद्धत

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेतून क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल त्या बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा बँकेच्या किसान क्रेडिट कार्ड विभागात जाणे गरजेचे आहे. या ठिकाणी अर्ज डाऊनलोड करावा आणि प्रिंट काढून झाल्यावर तो फॉर्म व्यवस्थित भरून घ्यावा. किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म हा बऱ्याच बँकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांसोबत भरलेला फॉर्म जवळच्या बँक शाखेत जमा करावा. त्यानंतर बँक अधिकारी अर्जदाराला काही आवश्यक माहिती विचारतात. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जाची मर्यादा निश्चित केली जाते व किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.

 किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची योग्य पद्धत

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन किसान योजना आणि किसान मानधन योजनेचे संबंधित माहिती देखील मिळू शकतात. याच संकेतस्थळावरून तुम्हाला एक फॉर्म देखील डाऊनलोड करता येतो. हा फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर तो बँकेत जमा करून किसान क्रेडिट कार्ड कर्ज सहजपणे मिळवता येते.