Monsoon Update: चार दिवस धोक्याचे…!! आजपासून ‘या’ तारखेपर्यंत ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस, पंजाबरावांचा हवामान अंदाज

Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने (Monsoon) महाराष्ट्रात विश्रांती घेतली होती. राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसात पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला नाही. मात्र आता पुढील चार दिवस पाऊस (Rain) पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे.

यामुळे उसंत घेतलेल्या पावसाचा पुन्हा एकदा कमबँक होणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून विश्रांती घेत असलेला पाऊस पुन्हा एकदा कोसळणार असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांच्या काळजाची धडधड वाढली आहे. मित्रांनो आधीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरसदृश्य परिस्थिती यामुळे शेतकरी बांधवांचा पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून यामुळे अनेक शेतकरी बांधवांना खरिपात दुबार पेरणी करावी लागली आहे.

यामुळे हवामान विभागाच्या या अंदाजाने शेतकरी बांधवांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे. खरे पाहता भारतीय हवामान विभागाने ऑगस्टमध्ये सर्वसाधारण पाऊस राहील असा अंदाज वर्तवला होता मात्र अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पावसासाठी पोषक वातावरण बनत असून यामुळे ऑगस्टमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा नवीन सुधारित अंदाज विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, आज 6 ऑगस्ट शनिवारी रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून 4 दिवस पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे देखील विभागाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रात एक विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जाणारे पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, आज, शनिवारी 6 ऑगस्ट रोजी, राजधानी मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

राज्यातील इतरही भागात आज मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. या व्यतिरिक्त उद्यापासून 9 तारखेपर्यंत राज्यात जवळपास सर्वत्र मोठा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात नव्हे-नव्हे तर संपूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सोमवार पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

पंजाबरावांनी सांगितली ही महत्वाची माहिती

पारनेर मध्ये एका कार्यक्रमात बोलताना पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी शेतकरी बांधवांना एक मोलाची माहिती दिली आहे. पंजाब राव यांच्या मते, मे महिन्यामध्ये एल लीनो आला की दुष्काळ पडतो आणि ला लीनाचे नाव आले की भरपूर पाऊस पडतो. परंतु एल लिनो आणि ला लीना हे काय आहे हे शेतकऱ्यांना समजतं नाही. शिवाय आतापर्यंत कोणीच शेतकरी बांधवांना याबाबत अवगत करण्याचा प्रयत्न केला नाही. खरं पाहता शेतकऱ्यांचे सर्व जीवनमान हे शेतीवर अवलंबून असते.

अशा परिस्थितीत हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र हवामान अंदाजातील ही वैज्ञानिक भाषा शेतकऱ्यांच्या डोक्याबाहेरची असते. यामुळे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जात नाही. खरं पाहता या आलटून-पालटून चालू राहणाऱ्या समुद्रातील प्रक्रिया आहेत. पंजाबराव यांच्या मते, सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये पेरू देश आहे.

पेरू देशाच्या किनाऱ्यावर प्रचंड महासागर आहे. या महासागराचे तापमान हळूहळू वाढत जाते, त्यावेळी भारतामध्ये दुष्काळ पडणार असा अंदाज दिला जातो. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 7 जूनला पाऊस येतो. जर जूनमध्येही जिल्ह्यात पेरणी नाही झाली, तर 10 जुलै ते 15 जुलै या दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडतो असे डख यांनी सांगितले.