Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज..! मुंबई सोबतच ‘या’ जिल्ह्यात ‘या’ दिवशी कोसळणार मुसळधार पाऊस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: राज्यात सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने (Monsoon) उघडीप दिली असल्याने उन्हाचे चटके आणि उकाडा वाढला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या (Monsoon News) धारा देखील बरसत आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या मध्ये आज तीन ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मात्र कोकण आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे मात्र काही तुरळक ठिकाणी यादरम्यान हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रमधील नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

तसेच भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांसाठी येलो ॲलर्ट जारी केला असून सदर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रात एक वेगळी छाप सोडणारे आणि शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जाणारे पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता समोर आला आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या ऑगस्ट महिन्यातील सुधारित अंदाजानुसार आज तीन ऑगस्ट रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्रमधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव परभणी बीड आणि नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

तसेच, उद्यापासून अर्थात 4 ऑगस्ट पासून ते 6 ऑगस्ट पर्यंत राजधानी मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या जिल्ह्यासमवेतच राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस कोसळणार आहे. एवढेच नाही तर सात आणि आठ ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र पाऊस राहणार आहे.

दरम्यान पंजाबराव (Panjab Dakh Weather Update) यांनी शेतकरी बांधवांना सल्ला देत सांगितले की, जेव्हा पावसाची उघडीप दिसेल तेव्हा शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करून घ्यावीत. निश्चितच पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार काही ठिकाणी शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे तर काही ठिकाणी शेतकरी बांधवांना नुकसानीचा देखील सामना करावा लागणार आहे.