Onion : कांद्याला मिळतोय अतिशय कवडीमोल दर! मात्र कांद्यावर प्रक्रिया करून कमवू शकता लाखों

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news : आपल्या देशात कांद्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. कांदा खरं पाहता एक नगदी पीक आहे. मात्र कांद्याच्या दरात असलेली अस्थिरता कायमच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तोट्यात आणत असते.

यामुळे नगदी पीक असून देखील कांद्याला बेभरवशाचे पीक म्हणून ओळखले जाते. इतर शेती मालाच्या तुलनेत कांदा पिकाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळते. यामुळे कांदा पिकाच्या बाबतीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा हटके विचार करणे आता गरजेचे झाले आहे.

शेतकरी मित्रांनो कांदा पिकावर प्रक्रिया करून निश्चितच चांगले उत्पन्न कमावले जाऊ शकते. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे कांदा हा अनेकदा आपल्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणत असतो.

अशावेळी सर्वसामान्य नागरिक कांदा खरेदी करण्याऐवजी कांद्यापासून निर्मित इतर उत्पादने खरेदी करतात जसे की कांद्याची पेस्ट.

विशेष म्हणजे कांद्याच्या किमती वाढल्या म्हणजेच कांद्यापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनाच्या देखिल किमती वाढतातचं.

यामुळे निश्चितच कांद्यापासून कांद्याची पेस्ट तयार करण्याचा व्यवसाय कांदा उत्पादकांसाठी चांगला पैसा कमवण्याचे माध्यम ठरू शकते.

किती गुंतवणूक करावी लागेल मित्रांनो कांद्यापासून पेस्ट तयार कारण्याचा व्यवसाय हा छोट्या स्तरापासून ते मोठ्या स्तरापर्यंत सुरु केला जाऊ शकतो यामुळे कांद्यापासून पेस्ट तयार करण्याच्या या व्यवसायासाठी गुंतवणुक देखील या व्यवसायाच्या क्षमतेवर आधारित आहे.

मात्र, एका सरकारीसंस्थेने तयार केलेला कांदा पेस्ट व्यवसायाच्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, हा व्यवसाय चार लाख वीस हजार रुपयात सुरू करता येऊ शकतो.

विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जर आपल्याकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसेल तर पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेत आपणास या व्यवसायासाठी कर्ज देखील उपलब्ध होणार आहे.

यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणुकीची फारशी काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले जाते. मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्राइंग पॅन, ऑटोक्लेव स्टीम कुकर, डिझेल भट्टी, स्टरलायझशन टँक, छोटे भांडे, मग, कप इत्यादी साहित्य लागते.

या साहित्यासाठी सुमारे दीड लाख ते पावणे दोन लाख रुपये खर्च येतो. प्रोजेक्ट नुसार एवढ्या पैशात जर हा व्यवसाय सुरु केला तर एका वर्षांमध्ये 193 क्विंटल कांद्याच्या पेस्टचे उत्पादन घेतले जाऊ शकते.

म्हणजेच तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने पेस्टची विक्री झाली तर बाजारामध्ये पाच लाख 79 हजार रुपयापर्यंत या पेस्टची किंमत बनते.

निश्चितच एका वर्षातच या व्यवसायासाठी आलेला सर्व खर्च काढला जाऊ शकतो. जाणकार लोकांच्या मते, यातून दीड लाखांचे निव्वळ उत्पन्न कमविले जाऊ शकते.