Poultry Farming : कधी ऐकले आहे का नाव अयाम सीमानीचे? ही आहे सर्वात महागडी कोंबडीची जात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Poultry Farming :- कुक्कुटपालन व्यवसाय अगोदर हा परसामध्ये परसातील कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणावर केले जायचे. परंतु या व्यवसायाने आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून यामध्ये आलेले अनेक प्रकारचे विकसित तंत्रज्ञान आणि कोंबड्यांच्या विविध जाती यामुळे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसाय केला जात आहे. अनेक तरुण देखील आता कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले असून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची पोल्ट्री फार्मिंग सध्या खूप नावारूपाला आलेली आहे.

जर आपण कोंबड्यांच्या जातींचा विचार केला तर भारतामध्ये अनेक कोंबड्यांच्या जाती आहेत व त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये देशी कोंबड्यांच्या खूप अशा जाती असून यातील सर्वात महागडी जात आपल्याला माहिती आहे आणि ती म्हणजे कडकनाथ ही होय. त्यासोबतच ब्रॉयलर कोंबड्यांचे पोल्ट्री फार्मिंग देखील आता मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु देशी कोंबडीचा विचार केला तर कडकनाथ पेक्षाही जगात सगळ्यात महाग असलेली एक जात आहे व तिचे नाव आहे आयाम सीमेनी हे होय. या जाती विषयी महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 अयाम सिमेनी आहे सर्वात महाग कोंबडीची जात

हि जगात सर्वात महाग अशी कोंबडीची जात असून जर तुम्ही गुगलवर देखील सर्च केले तर एक कोंबडी कमीत कमी भारतात दहा हजार रुपयाला मिळते. जर डॉलरमध्ये याची किंमत पाहिली तर साधारणपणे 2500 डॉलर इतकी साधारणपणे किंमत आहे. जर तुम्ही कोंबडीच्या या जातीची पूर्ण जगात देखील सर्च केला तर ही एक जगातील दुर्मिळ अशी प्रजात असून त्यामुळे ती इतकी महाग असते.

आता तुम्ही म्हणाल की या कोंबडीचे किंवा या जातीच्या कोंबड्याची एवढी किंमत का असते? जर आपण या कोंबडीची शरीर रचना पाहिली तर ती संपूर्ण काळ्या रंगाची असते. जवळजवळ ही कडकनाथ सारखीच दिसते. परंतु अयाम सीमानी या कोंबडीच्या प्रजातीमध्ये काळ्या रंगा शिवाय दुसरा कुठलाच रंग नसतो. कडकनाथ प्रजातीमध्ये कधीकधी सफेद रंगाची देखील कोंबडी येते किंवा कधी कधी सोनेरी छटा असलेली देखील कडकनाथ कोंबडी असते.

परंतु अयाम सीमेनी ही प्रजात रंगाने काळी असतेस परंतु हिचे सगळे अवयव देखील काळे असतात व हीचे मांस देखील काळे असते. ही प्रजाती इंडोनेशियाच्या जंगलांमध्ये आढळून येते व ही फारच दुर्मिळ असल्यामुळे हिचे दर इतके जास्त आहेत. जगातील कमीत कमी भागांमध्ये ही आढळून येते.

इंडोनेशिया या ठिकाणाहूनच अमेरिकेमध्ये ही प्रजात नेण्यात आली असून त्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे. तसेच चीनमध्ये देखील इंडोनेशिया या ठिकाणाहूनच ही जात नेण्यात आली आहे. या प्रजातीच्या कोंबडीचे मांस हे खूपच काळे असते व हेच तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

 भारतामध्ये या जातीची ब्रीडिंग करता येऊ शकते का?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतामध्ये या जातीची ब्रीडिंग करता येऊ शकते का? याचे उत्तर हो असे आहे. जर तुम्ही इंडोनेशियावरून अंडे आणायचे ठरवले तर तुम्ही या ठिकाणी ब्रीडिंग करू शकतात. परंतु या कोंबडीचे अंडे अगदी योग्य पद्धतीने भारतात आणणे गरजेचे आहे.

हे अंडे आणण्यासाठी आयात निर्यात आणि कस्टम ड्युटी भरल्यानंतर व सगळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंडे हॅचरीज करिता मागवले तर भारतामध्ये या जातीची ब्रिडिंग शक्य आहे. जर भारतामध्ये याची चांगल्या पद्धतीने ब्रिडींग आणि व्यवसाय सुरू झाला तर या जातीचे मार्केट हे श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान इत्यादी आजूबाजूच्या देशांमध्ये याची बाजारपेठ मिळणे शक्य आहे. परंतु यामध्ये बाजारपेठेचा शोध घेणे तसेच आयातदार शोधणे, असे जिवंत कोंबड्यांना एक्स्पोर्ट करता येते का?  इत्यादी प्रश्न फार महत्त्वाचे असून याबाबत पुरेशी माहिती घेऊन या जातीची भारतात ब्रिडिंग शक्य आहे.